अमेरिका: पत्नीच्या मैत्रिणीवर बलात्कार; हा गुन्हा चुकून घडल्याचा आरोपीकडून दावा
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: ANI)

अमेरिकेतील (America) पोकोनॉसमध्ये (Poconos) एका लग्न सोहळ्यादरम्यान, एका तरुणाने होणाऱ्या पत्नीच्याच मैत्रिणीवर बलात्कार केल्याचे माहिती समोर आली आहे. ही घटना घडली त्यावेळी ही महिला पूर्णपणे नशेत होती. पण जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा ती पुरुषांच्या लॉकर रुम होती. त्यानंतर आपल्यावर लैंगिक आत्याचार झाल्याचे तिला समजले. यावेळी आरोपीने नशेत होता आणि हे कृत्य त्याच्याकडून चकून घडले असल्याचे त्याने सांगितले. याप्रकरणी आरोपीकडून $100,000 रुपये दंड ठोठावत जामीन मंजूर करण्यात आला आहे. या जोडप्याचे लग्न झाले असून, याबदल त्याने पत्नीच्या मैत्रिणीची माफीही मागितली आहे.

डेनियल कार्ने असे 28 वर्षीय आरोपीचे नाव आहे. लग्न सोहाळ्यात सहभागी होण्याअगोदर पीडित महिलेने मद्यपानाचे भरपूर सेवन केले होते. माहितीनुसार, दुसऱ्या दिवशी ती शुद्धीत आली तेव्हा तिचा मैत्रिणीचा होणारा पती तिच्या समोर उभा होता. त्यानंतर त्या दोघांमध्ये बराच वेळ भांडणही झाले. घटनेच्या अगोदर पीडित महिला नशेत असल्यामुळे तिला व्यवस्थित चालता येत नव्हते. त्यामुळे पीडितच्या मैत्रिणीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला तिला नीट घेऊन जाण्यास सांगितले होते. पण जेव्हा ती शुद्धीत आली त्यावेळी पाहिले की, तिच्या मैत्रिणीचा होणारा नवरा हा तिच्या शेजारी झोपला होता, अशी माहिती पीडितने पोलिसांना दिली आहे. हे देखील वाचा- ठाणे परिसरात 25 वर्षीय मूकबधीर मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोघांना अटक

याप्रकरणी डेनियल कार्ने यांनी पत्नीच्या मैत्रिणीची माफी मागत त्याच्याकडून चूक झाल्याचे सांगतले. तसेच हे कृत्य त्याने जाणूनबुजून नाही केले, असे बोलून पीडित महिलेची माफी मागितली आहे.