Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: PTI)

ठाणे परिसरात (Thane) २५ वर्षीय मूकबधीर मुलीवर बलात्कार (Rape Case) केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही लाजिरवाणी घटना ठाणे परिसरात रविवारी सकाळी घडली. आरोपींना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. पीडित मुलगी वांद्रे (Bandra) परिसरात दासी म्हणून काम करत आहे. परंतु, कामासाठी बाहेर पडलेली मुलगी, जेव्हा घरी परत आली नाही, म्हणून मालकाने तिच्या पालकांना याची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

लखन काळे आणि संदीप कुऱ्हाडे असे आरोपींचे नावे आहेत. हे दोघही ठाणे रेल्वे स्थानकाजवळील परिसरात राहतात. पीडित ही विरार येथील रहवासी असून वांद्रे परिसरात दासी म्हणून काम करत आहे. रविवारी पडित सकाळी घराबाहेर पडून दुपार झाली तरी परतली नाही. यामुळे मालकाने तिच्या पालकांना सांगितले. परंतु, ती राहत्या घरीही आली नाही, अशी माहिती पालकांनी दिली. त्यानंतर पालकांनी वेळ न घालवता खेरवाडी पोलिसात तक्रार दाखल केली. संदीप हा पीडितला ओळखत असून त्यांच्यात प्रेमसंबंध आहे, तसेच संदीपला पीडितसोबत लग्न करायचे आहे, असे त्याने घरी सांगितले होते. परंतु, घरातील लोकांनी परवानगी न दिल्याने त्याने पीडित पळवून नेले. दरम्यान पीडितचा मोबाईल फोन सक्रीय होता. त्यावेळी ती ठाणे परिसरात असल्याचे कळले. सोमवारी ती संदीपसमवेत दादर रेल्वे स्थानकात सापडली. दरम्यान, लखन काळे याने तिच्यावर बलात्कार केल्याची लेखी माहिती पीडितने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी लखन आणि संदीप या दोघांना अटक केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने आरोपींना पोलीस पोलीस कोठडी सुनावली आहे. हे देखील वाचा- वाशी: 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करुन फरार झालेल्या तरुणाला अटक.

ANI चे ट्वीट-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदिप कुऱ्हाडे आणि लखन काळे हे दोघही मित्र आहेत. परंतु, घरच्यांनी लग्नासाठी परवानगी न दिल्याने संदीपने लखनला पीडितला तिच्या कामावरुन वांद्रे स्थानकावर आणण्यास सांगितले. मात्र, लखनने पीडितला वांद्रे स्थानकाकडे घेवून न जाता ठाण्यातील एका खोलीत नेले. दरम्यान, लखनने तिच्यावर बलात्कार केला, असे पीडित मुलीने पोलिसांना सांगितले आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 15 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.