वाशी: 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करुन फरार झालेल्या तरुणाला अटक
Image used for representational purpose only (Photo Credits: PTI)

15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual abuse) करुन फरार झालेल्या तरुणाला नवी मुंबई पोलिसांनी (New Mumbai Police) अटक केली आहे. ही घटना वाशी स्थानकाजवळील (Vashi Railway Station) परिसरात घडली आहे. लैगिंक अत्याचारातून गर्भवती झालेली पीडित मुलगी रुग्णालयात प्रसूतीसाठी गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. महापालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांनी ही माहिती पोलिसांना कळवली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी संबधित रुग्णालयात धाव घेवून मुलीच्या पालकांकडे विचारपूस करायला सुरुवात केली. दरम्यान, आरोपीने आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन पळ काढला आहे, अशी माहिती पालकांनी पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेवून त्याला अटक केली आहे.

जुल्फिकार खान (22) असे अरोपीचे नाव असून आरोपी हा मानखुर्द येथील मंडाळ भागातील रहवासी आहे. खान हा वाशी परिसरात लहान मुलांसाठी लागणारी वह्या पुस्तकांची विक्री करायचा. जुल्फिकार खान पुस्तक विक्रीसाठी सारखा वाशी येथे असल्याने त्याची पीडितसोबत ओळख झाली. पीडित वाशी स्थानकाजवळील परिसरात राहत आहे. जुल्फिकार खान आणि पिडित मुलगी 1 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. जुल्फियार याने याच ओळखीचा फायदा घेत पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करायला सुरुवात केली. त्यातून मुलगी गर्भवती राहल्यानंतर आरोपी जुल्फियान याने पलायन केले. मात्र, 5 दिवसांपूर्वी मुलीची पालक पीडितला प्रसूतीसाठी महापालिकेच्या रुग्णालयात घेवून आले. दरम्यान ही मुलगी अल्पवयीन असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. यामुळे डॉक्टरांनी वाशी पोलिसांना यासंदर्भात माहिती कळवली. हे देखील वाचा-Child Sexual Abuse: 300 धर्मगुरूंनी केले एक हजारहून अधिक लहान मुलांचे लैंगिक शोषण; चर्चसमोरील गंभीर समस्या.

या प्रकरणातील माहिती मिळताचा स्थानिक पोलिसांनी वाशीतील रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयात पोहचल्यानंतर पोलिसांनी पीडित मुलीच्या पालकांकडे विचारपूस केली. तेव्हा पुस्तक विकण्यासाठी येणाऱ्या मुलाने आपल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केले, अशी माहिती पालकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी वेळ न घालवता आरोपीचा शोध घेतला आणि अटक केली. तसेच आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.