कोरोना संकट काळामध्ये डॉनल्ड ट्र्म्प सरकारने तातडीने व्हिसा बॅन लागू करत अनेक परदेशी नागरिकांना, नोकरदारांना अमेरिकेमध्ये प्रवेशबंदी घातली होती. मात्र आता ट्र्म्प प्रशासनाने त्यामध्ये शिथिलता आणली आहे. नव्या नियमांनुसार, लॉकडाउन पूर्वी काम असलेल्या नोकरीसाठी H-1B व्हिसा धारकांना अमेरिकेत परतायचे असेल तर, त्यांना आता अमेरिकेमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. दरम्यान व्हिसावरील निर्बंध शिथिल करताना H-1B व्हिसा धारकाच्या साथीदाराला आणि मुलांनादेखील अमेरिकेत प्रवेशाची मुभा असेल.
दरम्यान 22 जून दिवशी डॉनल्ड ट्र्म्प यांनी आध्यादेश काढत 31 डिसेंबर म्हणजे 2020 च्या वर्ष अखेरीपर्यंत अमेरिकेमध्ये H-1B व्हिसा बॅन असेल असे सांगितले होते. त्यावेळेस किंवा आरोग्यक्षेत्रातील व्यक्तींना अमेरिकेमध्ये व्हिसा बॅन मधून वगळण्यात आले होते. मात्र आता या नियामांमध्ये बदल झाले आहेत.
ANI Tweet
United States government announces relaxations in some rules for H-1B visas. pic.twitter.com/fU4ff6rsJg
— ANI (@ANI) August 12, 2020
लॉकडाऊनमुळे अमेरिकेमध्येही मंदीचं वातावरण आहे. अशामध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्हिसा बॅनमध्ये थोडी शिथिलता आली आहे. आता अमेरिकेमध्ये टेक्निकल स्पेशॅलिस्ट, सिनियर लेव्हल मॅनेजर आणि अन्य H-1B व्हिसा असलेल्या कर्मचार्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
सध्या अमेरिकेमध्ये जगातील सर्वाधिक कोरोनारूग्ण आहेत. अमेरिकेमध्ये कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा 5,360,302 च्या पार गेला आहे.