Christmas Market Magdeburg | (Photo Credit- X)

Car Rams Crowd at Magdeburg Christmas Market: जर्मनीतील मॅग्डेबर्ग येथील ख्रिसमस बाजारात शुक्रवारी सायंकाळी एक भरधाव कार घुसली. ज्यामुळे रस्त्यावरील पायी जाणारे अनेक नागरिक चिरडले गेले. त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर 68 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 15 जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. गर्दीच्या ठिकाणी भरधाव कार चालवणाऱ्या संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, हा व्यक्ती वर्षीय सौदी नागरिक आहे. तो 50 वर्षांचा असून, लोन वुल्फ असे त्याचे नाव असल्याचे पुढे आले आहे.

जर्मनीमध्ये कारचालक राहायचा एकटाच

लोन वुल्फ हा सौदी नागरिक असला तरी, 2006 पासून जर्मनीमध्ये राहतो. त्यानेच कार बेदरकारपणे हाकत रस्त्यावरील नागरिकांचा बळी घेतले. अनेकांना जखमी केले, असा त्याच्यावर आरोप आहे. जर्मन पोलिसांनी त्याला अटक केली आहे. राज्याचे प्रीमियर रेनर हॅसलॉफ यांनी माहिती देताना सांगितले की, पूर्वी डॉक्टर म्हणून काम करणारा हा माणूस एकटाच राहात असे आणि कामही करत असे, अशी प्राथमिक माहिती आहे. आमचे पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, त्याने हे कृत्य इस्लामी अतिरेकीपणातून केल्याची कोणतीही माहिती नाही. आम्हाला तशी शक्यता वाटत नाही. दरम्यान, प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, प्राथमिक निष्कर्ष असे सुचवतात की, धिकाऱ्यांनी पीडितांना झालेल्या दुखापतींच्या तीव्रतेमुळे आणखी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारली नसली तरी, हल्लेखोराने स्वतंत्रपणे घटनेचे नियोजन केले असावे. (हेही वाचा, America: विस्कॉन्सिनमधील एका शाळेत झालेल्या गोळीबाराच्या घटनेत तीन जण ठार, अनेक जखमी)

आपत्कालीन प्रतिसाद आणि सार्वजनिक प्रतिक्रिया

घटनेची माहिती मिळताच जर्मनीच्या स्थानिक आपत्कालीन विभागाने तत्काळ प्रतिसाद दिला. माहिती मिळाल्याच्या पुढच्या काहीच मिनिटांमध्ये 100 अग्निशामक आणि 50 बचाव कर्मचाऱ्यांसह आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या. आपत्कालीन विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले तेव्हा परिस्थिती अतिशय गोंधळाची हती. लोक जखमी आणि असहाय आवस्थेत पडले होते. गर्दीही जमली होती. लोक मोठ्या प्रमाणावर भेदरले होते. त्यामुळे मदत कार्यातही काहीसा अडथळा निर्माण झाला. दरम्यान, जखमींना तातडीने वैद्यक उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. (हेही वाचा, Magical Destinations in India for Christmas: ख्रिसमस सुट्टी साजरी करण्यासाठी कुठे जाल? जाणून घ्या भारतातील 7 कास ठिकाणे)

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल, पण पुष्टी नाही

सोशल मीडियावर फिरत असलेल्या फुटेजची पडताळणी झाली नाही. मात्र, त्यामध्ये वाहन भरधाव वेगाने गर्दीत घुसताना दिसत आहे. प्रत्यक्षदर्शींनी या घटनेचा उल्लेख हल्ला असेच केले. जर्मन चॅन्सेलर ओलाफ स्कोल्झ यांनी शोक व्यक्त करत म्हटले की, 'आम्ही पीडित आणि त्यांच्या प्रियजनांसोबत आहेत. आम्ही मॅगडेबर्गच्या लोकांसोबत एकजुटीने उभे आहोत'. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी शहराला भेट देण्याची स्कोल्झची योजना आहे. (हेही वाचा, Afghanistan Road Accidents: अफगाणिस्तानमध्ये दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात 44 जण ठार; 76 जखमी)

घटनेचा थरार सीसीटीव्हीत कौद

दुर्घटनेनंतर ख्रिसमस बाजार बंद

पर्यटकांनी गजबजलेला मॅग्डेबर्ग ख्रिसमस बाजार या घटनेनंतर लगेचच बंद करण्यात आला. आपत्कालीन कर्मचाऱ्यांना त्यांची कर्तव्ये पार पाडता यावीत यासाठी परिसर रिकामा करण्याचे आवाहन आयोजकांनी जनतेला केले. म्युनिकमध्ये बायर्न म्युनिक विरुद्ध आर. बी. लीपझिग सामन्यादरम्यान एक मिनिट शांतता पाळली गेल्याने या शोकांतिकेने संपूर्ण जर्मनीमध्ये शोककळा पसरली आहे.

नाताळच्या बाजारपेठेवरील हल्ल्यांचा ऐतिहासिक संदर्भ

जर्मनीतील ख्रिसमस बाजाराला अशा प्रकारच्या हिंसाचाराचे लक्ष्य बनवण्याची ही पहिली वेळ नाही. 2016 मध्ये, इस्लामिक स्टेट गटाशी संबंध असलेल्या ट्युनिशियाच्या एका व्यक्तीने बर्लिनच्या ख्रिसमस बाजारात ट्रक चालवून 12 लोकांचा बळी घेतला होता. 2018 च्या स्ट्रासबर्ग गोळीबारासारख्या अशाच प्रकारच्या हल्ल्यांमुळे युरोपमधील सणासुदीच्या उत्सवांमध्येही व्यत्यय आला होता.