Pakistan Army Chief: पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख  घोषित; General Asim Munir सांभाळणार कमांड
General Asim Munir (Photo Credit- Twitter/ANI)

Pakistan Army Chief: पाकिस्तानच्या नव्या लष्करप्रमुखाची घोषणा करण्यात आली आहे. जनरल असीम मुनीर (General Asim Munir) यांची पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ (PM Shehbaz Sharif) यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. पाकिस्तानच्या नव्या लष्करप्रमुखाच्या शर्यतीत अनेक मोठी नावे सामील होती. त्यानंतर ही मोठी जबाबदारी जनरल मुनीर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मुनीर हे जनरल बाजवा यांची जागा घेतील.

कोण आहेत जनरल असीम मुनीर?

जनरल असीम मुनीर हे पाकिस्तानी लष्करातील सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा यांच्या निवृत्तीच्या वेळी लेफ्टनंट जनरल असीम मुनीर हे सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. लष्करातील दोन्ही प्रमुख पदांसाठी नोव्हेंबरपूर्वी शिफारशी पाठवायची असल्याने, त्या नावांमध्ये जनरल मुनीर यांचे नाव समाविष्ट करायचे की नाही हे बाजवा यांच्यावर अवलंबून होते. मुनीर 2017 मध्ये मिलिटरी इंटेलिजन्सचे डीजी होते. 2018 मध्ये ते 8 महिने ISI प्रमुख होते. (हेही वाचा - Shehbaz Sharif vs Irfan Pathan: इरफान पठाणचे पाकिस्तानी पंतप्रधानांना चोख प्रत्युत्तर, म्हणाला- दुसऱ्याच्या दुःखात तुम्ही आनंदी आहात)

दरम्यान, मुनीर ऑक्टोबर 2018 मध्ये इंटेलिजन्स चीफ बनले होते. पण अवघ्या आठ महिन्यांनी त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. मुनीर पाकिस्तानच्या ओपन ट्रेनिंग सर्व्हिस (OTS) द्वारे सैन्यात दाखल झाले. फ्रंटियर फोर्स रेजिमेंटचे जनरल मुनीर हे सर्वात वरिष्ठ थ्री स्टार जनरल आहेत. ते जनरल बाजवा यांचे आवडते अधिकारी मानले जातात. (हेही वाचा - Pakistan: इम्रान खान यांनी देशाच्या तिजोरीतील भेटवस्तू दुबईला कोट्यावधी रुपयांना विकल्या; PM Shehbaz Sharif यांचा आरोप)

जनरल बाजवा जेव्हा एक्स कॉर्प्सचे कमांडर होते, तेव्हा जनरल मुनीर तिथे ब्रिगेडियर म्हणून तैनात होते. 2017 मध्ये जनरल बाजवा यांनी त्यांना महासंचालक म्हणजेच मिलिटरी इंटेलिजन्सचे प्रमुख बनवले आणि वर्षभरातच ते ISIA चे प्रमुखही बनले. मात्र आठ महिन्यांनंतरच तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांच्या आदेशानुसार त्यांना या पदावरून हटवण्यात आले होते.