Shahid Khaqan Abbasi (Photo Credit: ANI)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. दरम्यान, सर्वसामान्यांपासून राजकीय नेते आणि बॉलिवूड कलाकारदेखील कोरोनाच्या जाळ्यात अडकले आहेत. यातच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीएमएल-एनचे नेते शाहिद खाकान अब्बासी (Shahid Khaqan Abbasi) यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना रविवारी कोरोनाची लागण झाली होती. तसेच आज अहवाल आल्यानंतर त्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे संपूर्ण पाकिस्तानात चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन केले आहे. अब्बासी यांनी ऑगस्ट 2017 पासून ते मे 2018 पर्यंत प्रंतप्रधानाची जबाबदारी संभाळली होती.

पाकिस्तानचे पहिले केंद्रीय राज्य मंत्री शहरयार अफरीदी, पीएमएल-एन संसद मिया नावेद अली, आणि पीपीपी नेता शरजील मेमन हे देखील कोरोनाच्या विळाख्यात सापडले आहेत. तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या पक्षातील नेते आमिर डोगर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व नेत्यांची प्रकृती स्थिर आहे. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत एक लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 2 हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा-Coronavirus Updates: जगभरातील COVID19 च्या संक्रमितांचा आकडा 68 लाखांच्या पार तर 4 लाखांहून अधिक जणांचा बळी

एएनआयचे ट्विट-

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूचे जाळे संपूर्ण जगात पसरले आहे. जगभरात 71 लाख 14 हजार 682 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 6 हजार 557 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 34 लाख 73 हजार 780 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.