Former China President Jiang Zemin Dies: चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष जियांग झेमिन (Jiang Zemin) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ते ल्युकेमिया या आजाराने ग्रस्त होते. त्यामुळे त्यांच्या शरीरातील अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते. 1989 च्या तियानमेन स्क्वेअर हत्याकांडानंतर चीनचे नेतृत्व करण्यासाठी जियांग झेमिन यांची निवड झाली. त्यांनी सुमारे एक दशक चीनवर राज्य केले. जियांगच्या कारकिर्दीत तियानमेन स्क्वेअरच्या निषेधानंतर चीनमध्ये कोणतीही मोठी निदर्शने झाली नाहीत.
चीनच्या विकासात महत्त्वाचे योगदान -
जियांग फॅक्टरी इंजिनियर ते जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशाचा नेता बनले. 1989 मध्ये त्यांनी पदभार स्वीकारला तेव्हा चीन आर्थिक आधुनिकीकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात होता आणि तियानमेन हत्याकांडातून सावरण्याचा प्रयत्न करत होता. परंतु 2003 मध्ये जियांग अध्यक्षपदावरून निवृत्त झाले, तोपर्यंत चीन जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य झाला होता. (हेही वाचा - Crocodile Kills Boy: मगरीने 8 वर्षांच्या मुलाला त्याच्या पालकासमोरच खाल्ले, Costa Rica येथील घटना)
दरम्यान, 1989 मध्ये लोकशाही समर्थक आंदोलकांवर रक्तरंजित कारवाईनंतर जियांग यांना चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख बनवण्यात आले होते. जियांग झेमिन हे जवळपास एक दशक चीनचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णयही घेतले. ज्याचा चीनवर मोठा प्रभाव पडला. जियांग झेमिन यांचा जन्म 17 ऑगस्ट 1926 रोजी झाला. 30 नोव्हेंबर रोजी वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (हेही वाचा - Zombie Virus Sparks Pandemic Fear: झोंबी व्हायरस COVID-19 नंतर ठरणार आव्हान? घ्या जाणून)
BREAKING: Former Chinese President Jiang Zemin, who led Communist Party after 1989 crackdown, has died at age 96, Chinese state TV reports. https://t.co/2tH1UOn3RE
— The Associated Press (@AP) November 30, 2022
काश्मीर प्रश्नावरही केलं होतं वक्तव्य -
1996 मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष जियांग झेमिन यांनी पाकिस्तानी संसदेत केलेल्या भाषणात काही समस्या सोडवता येत नसतील तर त्यांना पाठीशी घालायला हवे असे म्हटले होते. यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सामान्य होण्याच्या मार्गावर पुढे जाऊ शकतात. मात्र, चीनच्या माजी राष्ट्राध्यक्षांच्या चर्चेला पाकिस्तानने विरोध केला होता.