Photo Credit- X

 

Pakistan Shooting: पाकिस्तानातील पेशावरमधील (Peshawar) तहकल भागात शनिवारी दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबारात (Pakistan Shooting)पाच जण ठार आणि सहा जण जखमी झाल्याची माहिती आहे. वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) ऑपरेशन्स काशिफ जुल्फिकार यांनी सांगितले की, पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली. सध्या घटनास्थळी मोठा पोलिस ताफा तैनात करण्यात आला आहे. गोळीबाराची घटना घडताच हुल्लडबाजांनी तेथून पळ काढला. (Israel-Gaza War: इस्रायलचा गाझावर पुन्हा हवाई हल्ला; 30 ठार, अनेक जखमी)

लग्न समारंभातून काही जण परत येत असताना एका पुलाजवळ उपस्थित असलेल्या दुसऱ्या गटासोबत त्यांचा सामना झाला. त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. त्यानंतर दोन गटांमध्ये गोळीबाराची घटना घडली. ज्यात पाच जणांचा मृत्यू झाला आणि सहा जण जखमी झाले. मालमत्तेच्या कारणावरून ही घटना घडली. आत्तापर्यंत कोणालाही अटक झालेली नाही.

नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानच्या खैबर-पख्तुनख्वामध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये सात जण ठार झाले होते. यात एका महिलेसह दोन जण जखमी झाले होते. पहिल्या घटनेत बटखेला येथील बहादूराबाद परिसरात दोन गटात झालेल्या हाणामारीत पाच जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला.