(Photo Credits: X)

Lion Viral Video: जंगलातील भयंकर शिकारी प्राण्यांना बहुतेक लोक खूप घाबरतात यात शंका नाही, पण या प्राण्यांना जवळून पाहण्याची आवडही अनेकांना असते, त्यामुळे असे लोक जंगल सफारीला जातात किंवा प्राणिसंग्रहालयात जाऊन प्राण्यांना जवळून पाहतात. अनेकदा लोक अशी चूकही करतात की प्राणी त्यांच्यावर हल्ला करतात, त्यामुळे जनावरांपासून योग्य अंतर ठेवण्याचे आवाहन केले जाते. दरम्यान, सोशल मीडियावर एक रोमांचक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पर्यटक प्राणिसंग्रहालयाच्या पिंजऱ्यात हात घालून सिंहाचा फोटो काढत असताना सिंह त्यांच्याकडे येतो आणि शांतपणे त्याचा हात पिंजऱ्यातून बाहेर काढतो.

पाहा,  सिंहाचा व्हिडीओ व्हायरल

@AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाऊंटने हा व्हिडिओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "लायन विनम्रपणे पाहुण्यांना नियमांचे पालन करण्याचा आग्रह करतो. शेअर केल्यापासून या व्हिडिओला 19.6 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये पिंजऱ्यात एक सिंह फिरताना दिसत असून दोन पर्यटक पिंजऱ्याबाहेर दिसत आहेत. त्यातील एक जण पिंजऱ्यात हात घालून मोबाईल आत ठेवतो आणि सिंहाला आपल्या कॅमेऱ्यात कैद करू लागतो.

तेवढ्यात सिंह त्याच्याजवळ येतो आणि पंजाने त्याचा हात पिंजऱ्यातून बाहेर काढत पुढे सरकतो. सिंहाची ही प्रतिक्रिया पाहून जणू तो पाहुण्यांना नियम पाळण्याचे आवाहन करत असल्याचे दिसते.