Ismat Alam (Photo: @ACBofficials)

Zimbabwe National Cricket Team vs Afghanistan National Cricket Team 2nd Test 2025 Day 4 Scorecard:   झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा चौथा दिवस बुलावायो (Bulawayo)  येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब (Queens Sports Club)  येथे खेळला जात आहे. चौथ्या दिवशी अफगाणिस्तानचा दुसरा डाव 113.5 षटकांत 363 धावांवर आटोपला. यासह पाहुण्या संघाने झिम्बाब्वेला विजयासाठी  278 धावांचे लक्ष्य दिले. अफगाणिस्तानकडून दुसऱ्या डावात रहमत शाह आणि इस्मत आलम यांनी शतकी खेळी खेळली. रहमत शाहने 275 चेंडूत 139 धावा केल्या तर इस्मत आलमने 181 चेंडूत 101 धावा केल्या. याशिवाय राशिद खानने 23, शाहीदुल्ला कमालने 22 आणि कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने 13 धावा केल्या.  (हेही वाचा -  IND vs AUS 5th Test 2025: बूम बूम बुमराहची बातच न्यारी! भारताचा पराभव होऊनही जिंकला बॉर्डर-गावस्कर मालिकेचा 'प्लेयर ऑफ द सिरीज' पुरस्कार)

तर झिम्बाब्वेसाठी ब्लेसिंग मुझाराबानीने दुसऱ्या डावात सर्वाधिक 6 बळी घेतले. मुझाराबानीशिवाय रिचर्ड नगारावाने 3 बळी घेतले. तर सिकंदर रझाला 1 विकेट मिळाली. सध्या पाहुण्या संघाला मालिका जिंकण्यासाठी 278 धावा कराव्या लागणार आहेत. दोन्ही संघांमधील पहिली कसोटी अनिर्णित राहिली.

अफगाणिस्तानचा पहिला डाव

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानचा पहिला डाव 44.3 षटकांत 157 धावांत आटोपला. अफगाणिस्तानच्या एकाही फलंदाजाला पहिल्या डावात 30 धावांचा टप्पा गाठता आला नाही. पाहुण्या संघाकडून राशिद खानने सर्वाधिक 25 धावा केल्या. याशिवाय अब्दुल मलिकने 17 आणि रहमत शाहने 19 धावा केल्या. तर झिम्बाब्वेकडून गोलंदाजीत न्यूमन न्याम्हुरी आणि सिकंदर रझा यांनी सर्वाधिक 3-3 विकेट घेतल्या.

झिम्बाब्वेचा पहिला डाव

प्रत्युत्तरात झिम्बाब्वेचा पहिला डाव 73.3 षटकांत सर्वबाद 243 धावांवर आटोपला. झिम्बाब्वेसाठी कर्णधार क्रेग एरविनने पहिल्या डावात सर्वाधिक 75 धावा केल्या. एर्विनशिवाय सिकंदर रझाने 61 आणि सीन विल्यम्सने 49 धावा केल्या. अफगाणिस्तानकडून गोलंदाजी करताना राशिदने पहिल्या डावात सर्वाधिक 4 बळी घेतले. तर यामीन अहमदझाईने 3 आणि फरीद अहमदला 2 बळी मिळाले.