Australia National Cricket Team vs Indian National Cricket Team: क्रिकेटर समालोचक बनलेल्या इरफान पठाणने भारतीय फलंदाजांवर देशांतर्गत क्रिकेट न खेळल्यावरून टीका केली आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3-1 असा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर इरफान पठाणचे हे वक्तव्य आले आहे. इरफान पठाणने भारतीय क्रिकेटमधील सुपरस्टार संस्कृती संपुष्टात आणण्याचे आवाहन केले आणि एक मजबूत संघ-प्रथम मानसिकता तयार करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अलीकडच्या काळात विराट कोहलीच्या खराब कामगिरीकडेही इरफानने लक्ष वेधले. पठाणने कोहलीला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला आहे.
पाहा व्हिडिओ -
Time to shift the spotlight! 🌟 #IrfanPathan calls for an end to the superstar culture, emphasizing the importance of building a strong team-first mentality in Indian cricket💬🇮🇳#AUSvINDOnStar #ToughestRivalry #WTC #WorldTestChampionship pic.twitter.com/YQ6TKJUXe4
— Star Sports (@StarSportsIndia) January 5, 2025