UAE  मध्ये प्रवेशासाठी 12 वर्षावरील भारतीय प्रवाशांना COVID 19 Negative रिपोर्ट सादर करणं आवश्यक: Air India Express
File image of an Air India flight (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरस लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आता 5 महिने उलटले आहेत. या काळात ठप्प झालेली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आता हळूहळू सुरू केली जाते. एअर बबलच्या माध्यमातून काही देशांमध्ये प्रवासी आता ये-जा करू शकतात. दरम्यान त्यामधील युएई (UAE) त जाण्यासाठी PCR Test बंधनकारक करत असल्याचा निर्णय एअर इंडिया एक्सप्रेस कडून जाहीर करण्यात आला आहे.

ANI Tweet ने दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडिया एक्सप्रेसने आता 12 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिकच्या वयातील प्रवाशांना युएईमध्ये येण्यासाठी कोरोना PCR Test करावी लागणार आहे. ही 96 तासांपेक्षा अधिक जुनी नसावी. दरम्यान जर या टेस्टचा निकाल निगेटीव्ह असेल तर त्याचासरकारी लॅबचा प्रिंटेंट रिपोर्ट सादर करणं बंधनकारक असेल.

ANI Tweet

भारतामध्ये कोरोना व्हायरसचा एकूण आकडा 31 लाखांच्या पार गेला आहे. दरम्यान आता युके, अमेरिका, युएई मध्ये एअर बबलच्या माध्यमातून विमान वाहतूक मर्यादित स्वरूपात सुरू केली आहे. सोबतच वंदे भारत मिशन अंतर्गत विमान वाहतूक सुरू आहे.