Flood In Pakistan (PC - X/@volcaholic1)

Flood In Pakistan: पूर आणि मुसळधार पावसामुळे पाकिस्तानमध्ये हाहाकार माजला आहे. पाकिस्तान (Pakistan) मधील खैबर पख्तूनख्वा (Khyber Pakhtunkhwa) मध्ये आणखी 13 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. डॉनने प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (पीडीएमए) अहवालाचा हवाला देत सांगितले की, खैबर पख्तुनख्वामध्ये एका दिवसात जवळपास दोन डझन लोकांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या 59 वर पोहोचली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) ने प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (PDMA), जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA) आणि इतर संबंधित विभागांना 29 एप्रिलपर्यंत पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी आणि वादळासाठी तयार राहण्याचे निर्देश दिले होते.

डॉनच्या मते, यापूर्वी खैबर पख्तुनख्वामधील पीएमडीने बुधवार रात्रीपासून 21 एप्रिलपर्यंत शांगला, बुनेर, बाजौर, खैबर आणि पेशावरसह उच्च शिखरांवर पाऊस, गडगडाट आणि हिमवृष्टीचा अंदाज जारी केला होता. 12 एप्रिलपासून झालेल्या संततधार पावसामुळे प्रांताच्या उत्तरेकडील भागात अचानक पूर आला आहे, ज्यामुळे खैबर पख्तुनख्वामध्ये भूस्खलन झाले. (हेही वाचा -Pakistan: पाकिस्तानी संसदेत चोर? संसदेच्या मशिदीतून बूट आणि इतर मौल्यवान वस्तू चोरीला)

पावसाशी संबंधित घटनांमध्ये 72 जण जखमी -

पीडीएमएच्या ताज्या अहवालानुसार मृतांमध्ये 33 मुले, 14 पुरुष आणि 12 महिलांचा समावेश आहे. तसेच पावसाशी संबंधित घटनांमध्ये एकूण 72 लोक जखमी झाले आहेत. डॉनने दिलेल्या वृत्तानुसार, पुरावमुळे 2,883 घरे आणि 68 शाळा बाधित झाल्या आहेत.

पीडीएमएचे प्रवक्ते अन्वर शहजाद यांनी डॉन वृत्तवाहिनीला सांगितले की, शनिवारी नद्यांमधील पाण्याचा प्रवाह सामान्य होता. पाटबंधारे विभागाच्या पूर कक्षाच्या अहवालानुसार प्रांतातील 12 नद्यांमधील पाण्याच्या प्रवाहाची पातळी कमी ते मध्यम आणि सामान्य अशी वेगवेगळी आहे. दरम्यान, बलुचिस्तान पीडीएमएने बहुतांश जिल्ह्यांमध्ये सामान्य हवामानाची नोंद केली आहे.