Canada Flight Video: टेकऑफच्या वेळी विमानाच्या इंजिनला आग, प्रवाशी सुखरुप
Canada Flight PC TWITTER

Canada Flight Video: पॅरिसहून टोरंटोला (Toronto) जाणाऱ्या एअर कॅनडाच्या फ्लाइटला टेकऑफवेळी आग लागली होती. धुरा येत असल्यामुळे लगेच टोरोंटो विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. ही घटना बुधवारी घडली आहे. ही घटना एकाने मोबाइलमध्ये कैद केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एअरलाइनने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर या घटनेबाबत स्पष्टीकरण जारी केले. (हेही वाचा-  भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांचे तिसऱ्यांदा अंतराळ उड्डाण; बोईंगच्या Starliner अंतराळयानाद्वारे रात्री 8:22 वाजता घेतली झेप)

मिळालेल्या माहितीनुसार, आगीच्या घटनेनंतर प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाला. बोईंग 777-300 विमान विमानतळावरून उड्डाण घेत असताना त्यातील एका इंजिनमधून ज्यावाल निघताना दिसत आहे. फ्लाइटमध्ये 389 प्रवासी आणि 13 क्रू मेंबर्स होते. सर्व प्रवाशांना सुखरूप परत आणण्यात आले असून या घटनेत कोणतीही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. आग तात्काळ नियंत्रणात आणण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विमान कोसळले

वॉशिंग्टनमधील प्युगेट येथील सिएटलजवळ (Seattle) विमान कोसळले (Plane Crashed) आहे. हे विमान अपोलो 8 क्रू मेंबर युएस अंतराळवीर विल्यम अॅंडर्स (William Anders) उडवत होते. मिळालेल्या माहितीनुसार, विमान अपघातात दोन जण ठार झाले आहे. विमान क्रॅश झाल्याने थेट नदीत कोसळले आहे.