Sunita Williams Flies to Space: भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी बुधवारी संध्याकाळी बोईंगच्या स्टारलायनर यानातून अवकाशात झेप घेतली. यावेळच्या तिसऱ्या प्रक्षेपण प्रयत्नासाठी डिझाइनमध्येही त्यांनी मदत केली आहे. यापूर्वी, विविध तांत्रिक अडचणींमुळे प्रक्षेपण टेक ऑफच्या काही मिनिटांपूर्वी दोनदा थांबवावे लागले होते. याआधी 1 जून 2024 रोजी टेकऑफच्या चार मिनिटे आधी ग्राउंड कॉम्प्युटरने रॉकेटमध्ये तांत्रिक समस्या असल्याचे दर्शविल्यानंतर ते रद्द करण्यात आले. त्यापूर्वी 7 मे रोजीही अशीच परिस्थिती उद्भवली होती. आता सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) घेऊन जाणारी बोईंगची स्टारलायनर मोहीम आज, 5 जून रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 8:22 वाजता प्रक्षेपित करण्यात आली. अंतराळयान दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी रात्री 9.45 वाजता आयएसएसवर पोहोचेल.

स्टारलायनर अंतराळयान आणि त्याच्या उपप्रणालींची चाचणी घेण्यासाठी सुमारे एक आठवडा ते अंतराळ स्थानकात राहील. मोहीम यशस्वी झाल्यास, या अंतराळयानाचा वापर फिरत्या मोहिमांसाठी केला जाईल. म्हणजेच अंतराळवीर त्याद्वारे आयएसएसवर येतील आणि जातील. इतिहासात प्रथमच अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यासाठी अमेरिकेकडे 2 अंतराळयान असतील. सध्या अमेरिकेकडे फक्त इलॉन मस्कच्या स्पेसएक्स कंपनीचे ड्रॅगन स्पेसक्राफ्ट आहे. (हेही वाचा: Assam: आसाम येथे विद्यार्थ्यांनी घेतले AI आधारित 'आयरिस' या रोबोट कडून शिक्षणाचे धडे, गमतीशीर व्हिडीओ व्हायरल)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)