Shocking: जगात रोज गुन्हेगारी संदर्भातील अनेक घटना घडतात. यातील काही घटना हृदय पिळवटून टाकतात. या घटना समाजाला विचार करायला भाग पाडतात. अनेकदा मजबुरीतून गुन्हेगारी पावले उचलली जात असली तरी अनेकांची कारणे विचार करण्याच्या आणि समजून घेण्याच्या पलीकडेची असतात. अलीकडेच असे प्रकरण समोर आली होते, ज्यात लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने आपल्या जोडीदाराची हत्या केली. तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि अनेक दिवस फ्रीजमध्ये ठेवले आणि नंतर ते जंगलात फेकून दिले.
14 वर्षांपूर्वी घडली होती हृदयद्रावक घटना -
हे हत्याकांड आताचे नसून 2009 साली घडलेले आहे. जेव्हा लोकांना या गुन्ह्याची माहिती मिळाली तेव्हा लोकांनी याला रानटीपणा असं म्हटलं. त्यावेळी करीना हत्याकांडाची खूप चर्चा झाली. ज्यात प्रियकराने आधी प्रेयसीला पार्टीसाठी बोलावून संबंध ठेवले आणि नंतर तिला कापून खाल्ले. पोलिसांच्या चौकशीत त्याने आपला गुन्हा कबूल केला आणि त्यामागचे कारण सांगितले तेव्हा लोकांना धक्काच बसला. (हेही वाचा -Jammu News: प्रेयसीची हत्या केल्यावर आरोपीकडून आत्महत्येचा प्रयत्न, रुग्णालयात उपचार सुरु)
रशियात घडली ही धक्कादायक घटना -
वास्तविक, ही घटना रशियाची आहे. 16 वर्षीय करीना बर्दुचियानला कविता, गॉथ म्युझिक आणि कथांची आवड होती. याच ट्रेंडमुळे करीनाची मॅक्झिम नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. मॅक्सिम गोलोवत्सिख आणि करीना एका संगीत मैफिलीदरम्यान भेटले, जिथे सामान्य आवडीमुळे दोघांमधील जवळीक झपाट्याने वाढू लागली. करीना मॅक्सिमची फॅन झाली आणि तिने त्याच्यासाठी अनेक कविता लिहिल्या.
डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, करीनामध्ये इतका बदल झाला होता की तिने मॅक्सिमसारखे कपडे घालण्यास सुरुवात केली आणि त्याच्यासारखे वागण्यास सुरुवात केली. जेव्हा आई नादियाला करीनाच्या बदलामागील कारण समजले तेव्हा तिने त्याच्यापासून अंतर ठेवण्यासाठी तिच्यावर दबाव आणला. परंतु करीनाने ते मान्य केले नाही आणि गुप्तपणे ती प्रियकराला भेटत राहिली. 19 जानेवारी 2009 रोजी, शाळा सुटल्यानंतर करिनाने तिच्या आईला एका मित्राच्या घरी ग्रुप स्टडीसाठी जात असल्याचे सांगितले. तिच्या आईने दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजण्यापूर्वी ये असे सांगून परवानगी दिली. मात्र, ही परवानगी देताना तिला कल्पनाही नव्हती की, ही तिची आपल्या मुलीसोबतची शेवटची भेट असणार आहे.
ग्रुप स्टडीच्या बहाण्याने लावली पार्टीला हजेरी
दुसर्या दिवशी सकाळी करीना घरी पोहोचली नाही. तेव्हा तिची आई नादियाने तिच्या मैत्रिणीला फोन केला. जिथे ती ग्रुप स्टडी करायला गेली होती, पण करीना रात्रीच तिथून निघून गेल्याचे तिने सांगितले. मैत्रिणीने सांगितले की, तिला पार्टीला जाण्यासाठी कुठूनतरी फोन आला होता आणि ती संध्याकाळीच निघून गेली होती. नादियाच्या आईला काहीच समजले नाही. तिने तिच्या बाकीच्या मित्रांना फोन करायला सुरुवात केली. यादरम्यान तिला करिनाची डायरी सापडली. ज्यामध्ये मॅक्सिमबद्दल अनेक गोष्टी लिहिल्या होत्या. जेव्हा नादियाने ती डायरी वाचली, तेव्हा तिला समजायला वेळ लागला नाही की ती मॅक्सिमसोबत पार्टीला गेली होती. तिने तात्काळ पोलिसांत तक्रार नोंदवली.
दोन आठवड्यांनंतर सापडले करिनाच्या मृतदेहाचे तुकडे -
पोलिसांनी नादियाचा शोध सुरू ठेवला, परंतु मॅक्सिमला एक काल्पनिक व्यक्ती मानून, ते तिला शोधण्यास तयार नव्हते. मात्र, दोन आठवड्यांनंतर असे काही घडले ज्यामुळे या शोधाला नवी दिशा मिळाली. दोन आठवड्यांनंतर, डस्टबिनजवळून दुर्गंधी येत असल्याची तक्रार करणारा कॉल पोलिसांना आला. जेव्हा पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा मृतदेहाचे काही तुकडे आढळले, ज्याची ओळख पटवणे अशक्य होते. परंतु फॉरेन्सिक तज्ञ आणि सामग्रीच्या आधारे ते करिनाच्या मृतदेहाचे तुकडे असल्याचे ओळखले गेले.
एका फोनने झाला हत्येचा उलगडा -
हा खून कोणी केला असावा आणि त्यामागे नेमके कारण काय, याबाबत पोलिस अजूनही संभ्रमात होते, तेव्हाच एक फोन आला ज्याने सारे कोडे उकलले. हा फोन एकाटेरिना झिनोव्हिएवा नावाच्या मुलीचा होता. जी करीना ज्या पार्टीत गेली होती तिथे उपस्थित होती. एकाटेरीनाने सांगितले की, ही पार्टी तिच्या घरी आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये मॅक्सिम आणि करीना व्यतिरिक्त, युरी नावाची मुलगी आणि इतर दोन मुले देखील होती. रात्री उशिरापर्यंत हे लोक दारूच्या नशेत होते.
एकटेरीनाचे घर असल्याने, ती तिच्या खोलीत झोपायला गेली आणि मॅक्सिम, करीना आणि युरी तिथे बसले आणि पार्टी करत राहिले. सुरुवातीला काही वेळ मजेचे आवाज येत होते. पण काही वेळाने असे आवाज येऊ लागले ज्यामुळे एकटेरीनाला जाग आली. ती तिघेही उपस्थित असलेल्या खोलीकडे धावत गेली. परंतु ती खोलीत जाण्यापूर्वीच युरीने तिला थांबवले आणि सांगितले की मॅक्सिम आणि करीना काही खाजगी क्षण एकत्र घालवत आहेत. एकटेरिना परत तिच्या खोलीत गेली आणि सकाळी ऑफिसला निघाली तेव्हा करीना तिथे नव्हती.
पार्टीनंतर करिनाच्या मांसापासून बनवलेली डिश -
जेव्हा तिने हॉलमध्ये बसलेल्या मॅक्सिम आणि युरीला विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की, करीना तिच्या घरी गेली आहे. ती संध्याकाळी ऑफिसमधून परतली तेव्हा दोघेही तिथेच बसले होते. एकटेरिना घरी पोहोचल्यावर दोघांनी सांगितले की, आम्ही तुझ्यासाठी खास डिश बनवली आहे, ती खा आणि कशी आहे ते सांगा. जेव्हा एकटेरीनाने ती डिश खाल्ली तेव्हा तिला काहीतरी विचित्र वाटले आणि जेव्हा तिने ते काय आहे असे विचारले तेव्हा उत्तर ऐकून ती घाबरली. मॅक्सिमने सांगितले की, डिशमधील मांस करिनाच्या मृतदेहाचा काही भाग आहे.
यानंतर दोघांनी रात्रीचा किस्सा सांगितला. मॅक्सिमने सांगितले की, त्याने करीनासोबत शारीरिक संबंध ठेवले. नंतर एकत्र आंघोळ करू असे सांगून तिला बाथरूममध्ये नेले. तिथे मागून युरी घुसला आणि दोघांनी मिळून तिला पाण्यात बुडवून मारलं. मग मॅक्सिमने करीनाच्या शरीराचे तुकडे केले आणि काही भाग डिश बनवण्यासाठी सोडले आणि काही भाग पुरले. एकटेरीनाने दिलेल्या जवाबाच्या आधारे पोलिसांनी युरी आणि मॅक्सिम या दोघांनाही अटक करून तपास सुरू केला.
आरोपीने का केली हत्या?
सुरुवातीला दोघांनीही एकमेकांवर खुनाचे आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी कडकपणा दाखवल्याने दोघांनीही घटना घडल्याची वस्तुस्थिती मान्य केली. यानंतर पोलिसांनी दोघांना हत्येमागील कारण विचारले आणि त्यांनी दिलेले उत्तर ऐकून सर्वांनाच धक्का बसला. मॅक्सिमने सांगितले की, पार्टीदरम्यान नशेसाठी भरपूर वस्तू होत्या. मात्र, खायला फारसे काही नव्हते आणि रात्री उशिरा भूक लागल्यावर त्यांना बाहेर जेवण करण्यासाठी जाऊ वाटत नव्हते. याच कारणामुळे त्याने करीनाला मारून तिचे मांस खाण्याची योजना आखली.