Adult Film Star Sophia Leone Death: अॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिध्द अभिनेत्री सोफिया लिओन हीचं निधन, वयाच्या २६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Adult Film Star Sophia Leone Death: PC TWITTER

Adult Film Star Sophia Leone Death: अॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिध्द अभिनेत्री सोफिया लिओन हीचा मृत्यू झाला आहे. सोफियाच्या मृत्यूनंतर फिल्म इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. आठवडाभरापूर्वी ती राहत्या अपार्टमेंटध्ये बेशुध्दावस्थेत सापडली होती. तीच्या कुटुंबियांनी तीला कॉल करण्याचा प्रयत्न केला, परंतु तीने कोणताही प्रतिसाद दिला नाही त्यानंतर ती अपार्टमेंटमध्ये बेशुध्दावस्थेत आढळून आली. वयाच्या 26 वर्षी सोफियाने जगाचा निरोप घेतला. हेही वाचा- मीडिया टायकून रुपर्ट मर्डोक वयाच्या 92 व्या वर्षी 5 व्यांदा अडकणार विवाहबंधनात,

मिळालेल्या माहितीनुसार, सोफियाचे सावत्र वडिल माईक रोमेको यांनी या संदर्भात माहिती दिली. तीचा मृत्यू कशा झाला या संदर्भात चौकशी चालू आहे. गेल्या काही महिन्यांत अॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीतील अनेक कलाकांराचा मृत्यू झाला आहे त्यामुळे चित्रपट क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.  तिच्या वडिलांनी सांगितले आहे की, सोफियाच्या निधनामुळे तिच्या कुटुंबियावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या अंत्यसंस्कारासाठी फंडिग गोळा केली जात आहे.

काही दिवसांपासून सोफिया सोशल मीडियावर खूप सक्रिय होती. तिने काही पोस्टही केल्या होत्या. अॅडल्ट फिल्म स्टार एमिली विलिसला रुग्णालयात दाखल केल्यानंतर दोनच दिवसांनी ही बातमी समोर आली आहे.  एमिलीला 5 फेब्रुवारी रोजी रुग्णालयात नेण्यात आले आणि सांगितले की ती व्हेंटिलेटरवर तिच्या आयुष्याशी लढत आहे. स्थानिक वृत्तानुसार, गेल्या तीन महिन्यापासून चार अॅडल्ट फिल्म इंड्रस्टीतील कलाकांराचा मृत्यू झाला आहे.