अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी वर्णभेदाविरोधी केलेल्या वादग्रस्त पोस्टला पाठिंबा न दर्शवल्यामुळे फेसबुक फाऊंडर मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) याच्यावर टीका करणाऱ्या कर्मचाऱ्याला फेसबुकने (Facebook) घरचा रस्ता दाखवला आहे. एका ओपन प्रोजेक्टच्या डॉक्युमेंटेशनमध्ये Black Lives Matter ला पाठिंबा देणारं वक्तव्य न केल्यामुळे या व्यक्तीने आपल्या सहकर्मचाऱ्यावर ट्विटरवरुन टीका केली होती. रिपोर्ट्सनुसार, सियाटलमध्ये स्थायिक असलेल्या युजर इंटरफेस इंजिनियर Brandon Dail याने Black Lives Matter ला सपोर्ट न करणाऱ्या सहकर्मचाऱ्यावर टीका केली होती. (Anti Apartheid Movement: वर्णभेद विरोधी लढ्याला Amazon कंपनीकडून 1 कोटी डॉलरची मदत)
सहकर्मचाऱ्यावर टीका केल्याने आपल्याला फेसबुकने कामावरुन काढून टाकले आहे, असे Brandon Dail याने ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. Black Lives Matter ला सपोर्ट न केल्याबद्दल मार्क झुकरबर्ग याच्यावर टीका करण्यात Brandon Dail सह इतर काही कर्मचारी सहभागी होते. 2 जून रोजी Dail याने ट्विटरद्वारे आपलल्याला कामावरुन काढून टाकल्याची माहिती दिली होती. त्याने दिलेल्या माहितीला फेसबुकद्वारे दुजोरा देण्यात आला आहे.
Dail ने केलेल्या ट्विटमध्ये किती तथ्य आहे ते ठाऊक नाही ते आम्ही सांगू शकत नाही, असे फेसबुक प्रवक्तांचे म्हणणे आहे. परंतु, मी केलेले ट्वीट अत्यंत खरे असल्याचे Dail चे म्हणणे आहे. गेल्या महिन्यामध्ये Minnesota येथे झालेल्या लुटमारीबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या ट्विटमुळे वर्णभेद विरोधात आंदोलन सुरु झालं. डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेले ट्विट ट्विटरने काढून काढले. कारण ते ट्विटरच्या violence policy च्या विरुद्ध होते.