फेसबुक (Facebook) कंपनीचे सीओओ शेरिल सँडबर्ग (Facebook COO Sheryl Sandberg) यांनी इशारा देत म्हटले आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या पोस्ट जर भडकावू असल्याचे आढळू आले तर त्या हटविण्यात येतील. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्ट जर फेसबुकने ठरवलेल्या मानकांचे उल्लंघन करताना आढळल्या तर त्या हटविण्या येतील. येत्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुका पार पडत आहेत. या पार्श्वभूमीवर फेसबुकने दिलेल्या इशाऱ्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
एमएसएनबीसी सोबत बोलताना सँडबर्ग यांनी म्हटले की, राष्ट्राध्यक्षांनी (ट्रम्प) जेव्हा काही भडकावू भाषेत काही पोस्ट आमच्या मानकांच्या विरोधात असल्याचे ध्यानात आले तेव्हा फेसबुकने त्या हटवल्या आहेत. कोरोना व्हायरस अथवा मतदारांवर प्रभाव टाकण्यासंदर्भात काही आक्षेपार्ह असेल तर ते त्वरीत हटविण्यात येईल. (हेही वाचा, US Presidential Elections 2020: राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीत Joe Biden डेमोक्रेटिक पक्षाचे अधिकृत उमेदवार)
निवडणूकीत आपला निष्पक्षपणा कायम ठेवण्यासाठी फेसबुकने गेल्या आठवड्यात काही माहिती केंद्रांची घोषणा केली. ज्याद्वारे 2020 मध्ये होणाऱ्या निवडणुकीपूर्वी अमेरिकी मतदारांना मतदानासंबंधी अचूक आणि महत्त्वाची माहिती उपलब्ध होऊ शकेल. हे मतदान माहिती केंद्र फेसबुक आणि इन्स्टाग्राम या दोनी मंचावर उपलब्ध असणार आहे.
सुमारे 400 पेक्षा अधिक जाहीरातदारांनी फेसबुकवर बहिष्कार टाकल्यानंतर आणि आपल्या कर्मचाऱ्यांना असंतोषाचा सामना करावा लागल्यानंतर फेसबुकने काही पावले उचलली आहेत. सँडबर्ग यांनी पुढे सांगितले की, कंपनी काही आर्थिक कारणं अथवा जाहिरातदारांचा दबाव यासमोर झुकणार नाही. तसेच, भडकावू भाषणांविरोधात कारवाई करण्यास कुचरणार नाही. आम्ही हे करतच राहू कारण आम्ही योग्य मुद्द्यावर आहोत.