US Presidential Elections 2020: राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीत Joe Biden  डेमोक्रेटिक पक्षाचे अधिकृत उमेदवार
Joe Biden | (Photo Credits: Facebook)

अमेरिकेच्या राषट्राध्यक्ष पद (US Presidential Elections 2020) निवडणुकीचे बिगूल वाजले असून प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. अमेरिकेत रिपब्लिक (Republican Party) विरुद्ध डेमोक्रेटिक (Democratic Party) या दोन प्रमुख पक्षांमध्ये सामना रंगतो. त्यामुळे टेमोक्रेटिक पक्षाने अधिकृतपणे आपला उमेदवार जाहीर केला आहे. जो बायडेन (Joe Biden) हे डेमोक्रेटिक पक्षाचे अधिकृत उमेदवार असणार आहेत. सध्या रिपब्लिक पक्षाचे डॉनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे राष्ट्राध्यक्ष आहेत. सहाजिकच रिपब्लिक पुन्हा एकदा ड्रम्प यांनाच संधी देणार हे उघड आहे. त्यामुळे सत्ताधारी डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध जो बायडेन असा सामना पाहायला मिळू शकतो.

या आधी झालेल्या अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध हिलरी क्लिंटन असा सामना रंगला होता. ट्रम्प हे रिपब्लिक पक्षाकडून तर हिलरी डेमोक्रॅटिक पक्षाकडून रिंगणात होते. दोन्ही उमेदवार तगडे होते. मात्र, अखेरच्या क्षणी ट्रम्प यांनी बाजी मारली. हिलरी क्लिंटन यांचा पराभव झाला.

प्राप्त माहितीनुसार, अमेरिकी डेमोक्रेटिक नॅशनल कन्वेंन्शनमध्ये मतदान घेण्यात आले. या वेळी जो बायडेन यांना सर्वाधिक पसंती मिळाली. या वेळी अमेरिकी सीनेटर क्रिस कॉन्स आणि अमेरिकी प्रतिनिधि लिसा ब्लंट रोचेस्टर यांची भाषणे झाली. (हेही वाचा, US Presidential Election 2020: Kamala Harris, भारतीय वंशाच्या सिनेटरची अमेरिकेच्या उपराष्ट्रपदी उमेदवार म्हणून निवड; Joe Biden यांची घोषणा)

या वेळी बोलताना कॉन्स यांनी सांगितले की, जो बायडेन हे बंदुकीच्या जोरावर होणारी हिंसा आणि पर्यावरण बदल या मुद्द्यांच्या सोडवणूकीस प्राधान्य देतील. ते जगभरातील हुकुमशाही विरोधात उभे ठाकतील. या वेळी त्यांनी सैन्यातील लष्कराचेही समर्थन केले. पुढे बोलताना ते म्हणाले, आर्थिक मंदीनंतर देशाला पुन्हा नव्याने उभे करण्यासाठी बायडेन प्रयत्न करतील.