The F-35 Jet crashed at Hill Air Force Base. (Photo credits: YouTube)

उटाहमधील हवाई दलाच्या तळावर बुधवारी F-35 लढाऊ विमान क्रॅश (Fighter Jet Crashes) झाले. या घटनेत विमानाचा पायल गंभीर जखमी झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, विमान अबघातग्रस्त होताच पायलट बाहेर पडला. मात्र, त्याला गंभीर दुखाबत झाली. त्यामुळे वैद्यकीय उपचारासाठी आणि त्याच्या प्रकृतीच्या हालचाली निरीक्षणासाठी रुग्णालयात नेण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, 388th Fighter Wing ने अपघातग्रस्त विमानाबद्दल ट्विटरवर माहती दिली. या माहितीत म्हटले की, F-35 A लाइटनिंग II हिल एअर फोर्स बेस रनवेच्या उत्तर टोकाला कोसळले. अपघाताचे कारण अस्पष्ट असून त्याचा तपास केला जाईल.

विमान अपघातग्रस्त होताच तळावरील आणि बाहेर दोन्ही आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन मदतीच्या मागणीला प्रतिसाद दिला. ब्रॉक थर्गूडयांनी अपघाताबद्दल अधिक माहिती देताना सांगितले की, पायलट चालत होता आणि तो सुरक्षीत होता. परंतू, अल्पावधीतच त्याला लक्षात आले की आपल्या हाताल काहीशा झिनझिन्या जानवत आहेत. त्याचे हाताकडे लक्ष जाताच त्याने पाहिले की, त्याचे हात रक्ताने माखले होते. त्याला काहीसा मुकामारही बसला होता. (हेही वाचा, तेलंगाना: रंगारेड्डी जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी खासगी विमान कोसळले; पायलट सुरक्षित)

ट्विट

थर्गुड यांनी पुढे म्हटले की, आम्हाला अद्याप अपघात कसा घडला हे समजू शकले नाही. पण हा धक्का आमच्यासाठी मोठा होता. दरम्यान, हिल एअर फोर्स बेस सॉल्ट लेक सिटीच्या उत्तरेस सुमारे 30 मैल (48 किलोमीटर) स्थित आहे, असेही त्यांनी सांगितले.