तेलंगाना: रंगारेड्डी जिल्ह्यात प्रशिक्षणार्थी खासगी विमान कोसळले; पायलट सुरक्षित
तेलंगाणा येथे विमान अपघात (Photo Credit : ANI)

तेलंगाना येथील रंगारेड्डी जिल्ह्यात बुधवारी (२१ नोव्हेंबर) विमान कोसळून अपघात घडला. हा अपघात रंगारेड्डी जिल्ह्यातील शंकरपल्ली तालुक्यातील मोकिला गावात घडला. प्राप्त माहितीनुसार हे विमान प्रशिक्षणार्थींचे आणि खासगी होते. अपघातात विमानाचा पायलट सुरक्षित आहे.

प्राप्त माहितीनुसार, भास्कर भूषण (वय २५ वर्षे) असे पायलटचे नाव असून, तो प्रशिक्षणार्थी आहे. हे विमान राजीव गांधी एव्हिएशन अॅकेडमीचे आहे. अचानक उद्भवलेल्या तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळ्याची प्राथमिक माहिती आहे. (हेही वाचा, इंडोनेशिया येथील विमान अपघातानंतर भारतही सावध; विमान कंपन्यांना दिला सतर्कतेचा इशारा)

दरम्यान, विमानस कोसळताना पाहून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीने एकच खळबळ उडाली. विमान कोसळल्यानंर परिसरातीन नागरिक आणि बघ्यांनी घटनास्थळावर गर्दी केली होती. दरम्यान, अपघाताची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थली तातडीने धाव घेतली. पोलीस पुढील तपास करात आहेत.