EU On Ukraine: यरोपीय संघाकडून युक्रेनला 1 Billion यूरोची मदत, रशियाची 13 Billion डॉलर किमतीची संपत्ती जप्त
Russia-Ukraine War | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष (Russia-Ukraine War) अद्यापही कायम आहे. या पार्श्वभूमीवर यूरोपीय संघाच्या (EU) अर्थमंत्र्यांनी सोमवारी सांगितले की, यूक्रेनला (Ukraine) 1 बिलियन यूरोची आर्थिक मदत देण्यास मंजूरी देण्यात आली आहे. यूरोपीय संघाने युक्रेनसाठी 9 बिलीयन डॉलरची मदत करण्याचे अश्वासन दिले होते. या अश्नासनातील एकूण रकमेचा पहिला हप्ता युक्रेनला दिला जात आहे. चेक रिपब्लिकचे अर्थमंत्री जाबेनेक स्टेंजुरा (Zbynek Stanjura) यांनी म्हटले आहे की, युक्रेनला आवश्यक निधी देण्यात येईल. ज्यामुळे तो अत्यावश्यक गोष्टी पूर्ण करु शकेल. यासोबत युक्रेनचा गाडाही आवश्यकतेनुसार पुढे रेटला जाईल.

यूरोपीय संखाचे जस्टीस कमिश्नर दिदिर रेंडर्स (Didier Reynders) यांनी मंगळवारी म्हटले की, जेव्हापासून रशियाने युक्रेनवर हल्ला (24 फेब्रुवारी) केला तेव्हापासून आतापर्यंत यूरोपीय सघाने रशियाची 13.8 बिलियन डॉलर इतक्या रकमेची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. रेंडर्स यांनी प्रागमध्ये म्हटले आहे की, या वेळी आम्ही मोठे मालमत्ताधारक आणि उद्योगपती अशी मिळून 13.08 बिलियन यूरोची संपत्ती जप्त केली. आम्ही सांगू इच्छितो की, 12 बिलियनपेक्षाही अधिक भाग यात केवळ पाच देशांतून आला आहे. त्यांनी ईयूच्या चेक प्रेसीडन्सीमध्ये ईयू जस्टिस मिनिस्टर्सच्या अनौपचारीक बैठकीत हे वक्तव्य केले. (हेही वाचा, Vladimir Putin : रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या घरी हलणार लवकरच पाळणा, पुतिन वयाच्या 70 व्या वर्षी होणार बाबा?)

जस्टीस कमिश्नर दिदिर रेंडर्स यांनी त्या पाच देशांची नावे सांगण्यास नकार दिला. मात्र पुढे म्हटले की, आशा आहे की, 27 देशांच्या समूहामध्ये इतर देशही आपले प्रयत्न वाढवतील. जर्मनीचे अर्थमंत्री क्रिश्चन लिंडनर यांनी जूनमध्येच प्रसारमाध्यमांना सांगितले होते की, केवळ जर्मनीनेच 4.48 बिलियन यूरो इतक्या रकमेची रशियाची संपत्ती जप्त केली आहे. जूनच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय सेक्शन टास्क फोर्सने म्हटले होते की, त्यांच्या सदस्यांनी ज्यात अनेक यूरोपीय संघातील देशांचा समावेश आहे. रशियाचे उद्योगपती आणि अधिकारी यांची 30 बिलीयन डॉलर पेक्षाही अधिक संपत्ती जप्त करण्यात आली आहे.