Mahatma Gandhi Spectacles: महात्मा गांधी यांच्या चष्म्याचा लिलाव, किंमत ऐकुन व्हाल थक्क
Mahatma Gandhi Spectatcle (Photo Credits: Twitter, File Image)

महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांंच्या सोन्याच्या कडा असलेल्या चष्म्याचा अलिकडेच इंग्लंड मध्ये लिलाव झाला. साउथ वेस्ट इंग्लंड मधील 'ईस्ट ब्रिस्टल ऑक्शन' कंपनीने लिलाव आयोजित केला होता. इंग्लंडमधील एका वृद्ध दुकानदाराकडे गांधींजींचा हा चष्मा होता. या विक्रेत्याच्या काकांना महात्मा गांधी यांनी स्वत: हा चष्मा भेट दिला होते. महात्मा गांधी यांनी 1900 सालपर्यंत हा चष्मा वापरत होते. ब्रिटीश पेट्रोलियम मध्ये काम करत असताना 1910-30 मध्ये गांधीजींनी एका इसमास हा चष्मा भेट म्हणुन दिला होता. या चष्म्याला सोन्याची कडा असल्याने आणि अर्थात त्याचे ऐतिहासिक महत्व पाहता साधारणपणे 14 लाखापर्यंत हा चष्मा विकला जाईल अशी अपेक्षा होती मात्र अमेरिकेच्या एका संग्रहकाने या चष्म्यासाठी लावलेली बोली ऐकुन सगळेच थक्क झाले.

प्राप्त माहितीनुसार, या चष्म्याची अंदाजे किंमत 9.79 ते 14.68 लाख रुपये आहेत. हा ऑनलाईन लिलाव सुरु झाल्यावर 14 लाख ही मुळ रक्कम ठेवली होती, मात्र बोली लागत गेली आणि अखेरीस 2 कोटी 55 लाख रुपये इतक्या किंंमतीला हा चष्मा विकला गेला.

पहा ट्विट

लिलावकर्ते ऍण्डी स्टोव यांनी सांंगितल्यानुसार, या महिन्याच्या सुरुवातीला एका विक्रेत्याने चष्म्यांबाबत सांंगताना जर ते चांगले नसतील तर त्यांना फेकून द्या असे सांगितले होते मात्र आता या चष्म्याला मिळालेली किंंमत आश्चर्यजनक आहे. या लिलावातील बोली मुळे कंंपनीने लिलावात विक्रमच केला आहे असे सुद्धा स्टोव्ह यांनी सांगितले आहे.