Photo Credit- X

 

US:  न्यूयॉर्क एअरलाइन्सच्या विमानात एक विचित्र घटना घडली. एका महिलेच्या डोक्यात उवा(Flight Passenger Hair Lice) दिसल्याने विमानाला फिनिक्समध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले. त्यामुळे विमानाला १२ तासाचा उशीर झाला. इथन जुडेल्सन नावाच्या प्रवाशाने टिकटॉक व्हिडिओमध्ये आपला अनुभव शेअर केला. त्यांनी सांगितले की, विमानात उपस्थित असलेल्या क्रू मेंबर्सनी फारशी माहिती दिली नव्हती, मात्र एका महिला प्रवाशाच्या डोक्यात उवा आढळल्याने विमानाचे आपत्कालीन लँडींग करावे लागले. इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार ही घटना जूनमध्ये घडली होती.

व्हिडिओमध्ये एथन जुडेल्सनने आपला अनुभव शेअर करताना म्हटले आहे की, 'विमानाचे आपत्कालीन लँडींग का करावे लागले? याबाबत त्यावेळी मला काही माहित नव्हते. आजूबाजूला पाहिले, तेव्हा सर्व काही ठिक होते. आम्ही विमानातून बाहेर पडलो. जेव्हा आम्ही उतरलो, अचानक एक स्त्री आमच्या समोर आली.' ज्युडेल्सनने इतर प्रवाशांकडून ऐकले की काहींनी महिलेच्या डोक्यावर उवा रेंगाळताना पाहिल्या. याबाबत त्यांनी फ्लाइट अटेंडंटला माहिती दिली.

'दोन मुलींनी महिलेच्या डोक्यावर उवा रेंगाळल्याची तक्रार नोंदवली. विमानातून उतरल्यानंतर प्रवाशांना 12 तासांच्या विलंबाची माहिती देण्यात आली. प्रवाशांना हॉटेलचे व्हाउचर देखील देण्यात आले,' जुडेलसन यांनी टिकटॉक व्हिडिओमध्ये म्हटले आहे. सर्व गोष्टी व्यवस्थित पार पडल्यानंतर विमान लॉस एंजेलिसला हलवण्यात आले.