Elon Musk ने उठवले COVID 19 Test निकालांच्या अचूकतेवर प्रश्नचिन्ह; एकाच दिवसात त्याच्या 4 टेस्टचे वेगवेगळे रिपोर्ट्स
Elon Musk (Photo Credits: Getty Images)

सध्या अमेरिकेमध्ये कोरोना वायरसचं थैमान सुरू आहे. दिवसागणिक लाखो लोक कोरोनाबाधित होत आहे. अशामध्येच आज (13 नोव्हेंबर) Tesla Inc CEO Elon Musk ने कोरोना टेस्ट आणि त्याच्या रिपोर्ट्सबद्दल केलेलं ट्वीट काळजीत भर टाकणारं आहे. दरम्यान एलन मास्कने एका दिवसांत 4 वेळेस करोना टेस्ट केली आणि आश्चर्य म्हणजे त्यातील 2 रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आणि 2 निगेटिव्ह आले आहे. त्याचे हे रिपोर्ट्स अ‍ॅन्टिजन टेस्टचे आहेत. हे रिपोर्ट पाहून त्याने काही तरी बोगस सुरू असल्याचं म्हटलं आहे. RT-PCR, Antigen, Antibody Test: कोविड 19 चं निदान करण्यासाठी केल्या जाणार्‍या विविध COVID Tests टेस्ट मधील नेमका फरक काय ते कोणती चाचणी कधी करावी?

ट्वीट करत एलम मास्क म्हणतो, ' काहीतरी बोगस प्रकार सुरू आहे. आज दिवसभरात कोविडची एकच टेस्ट, एकच नर्स, एकच मशीन पण अ‍ॅन्टिजन टेस्टचे निकाल वेगवेगळे.' एका मीडीया रिपोर्टनुसार, आता एलन मास्क कोविड 19 च्या निदानासाठी PCR Test करणार आहे. ही दुसर्‍या लॅबमध्ये होणार असून त्याचे 24 तासांत रिपोर्ट्स मिळतील. दरम्यान एलनला ट्वीटर वर @JaneidyEve युजरने काही लक्षणं आहेत का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर एलनने रिप्लाय करत, 'केवळ साधी सर्दी' असल्याचं म्हटलं आहे.

एलन मस्क ट्वीट

एलनने काही दिवसांपूर्वी बोलताना कोरोना वॅक्सिन उपलब्ध झाली तरी ती घेणार नसल्याचं म्हटलं होतं. कारण त्याला वाटत होतं तो किंवा त्याचा परिवार या संकटात येऊ शकत नाही. त्याने लॉकडाऊन देखील न करण्याला पाठिंबा दिला होता.

दरम्यान अमेरिकेत सध्या कोरोना वायरसचा हाहाकार सुरू आहे. जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण अमेरिकेमध्ये आहेत. कोविड 19 चे जगामध्ये 12 लाखाहून अधिक जण बळी गेले आहेत. तर जगभरात कोरोनाची लागण 5 कोटीपेक्षा अधिक जणांना झाली आहे.