Bangladesh - Dubai विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न, विमानात गोळीबार
Bangladesh Airlines Flight Representational Image (Photo Credits: Twitter)

Biman Bangladesh Airlines चं बांग्लादेशहून दुबईला जाणारे Flight BG 147  विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. या विमानाचं इमरजंसी लँडिंग करण्यात आलं आहे. यादरम्यान विमानात गोळीबार करण्यात आला आहे. सारे प्रवासी सुरक्षित आहेत. Shah Amanat International Airport, Chittagong येथे विमानाचं इमर्जंसी लँडिंग करण्यात आलं आहे. क्रू मेंबर जखमी झाला आहे. संघ्याकाळी 5.40 च्या वेळेची घटना आहे. बांग्लादेशाच्या पंतप्रधानाची बोलायचं असं म्हणून एका अज्ञात व्यक्तीने गोळी चालवली.  Mumbai: Air India च्या कार्यालयात विमान हायजॅक करण्याच्या धमकीचा फोन, देशभरातील साऱ्या विमानतळांवर High Alert जारी

विमानतळावर सुरक्षा अधिकारी आणि पोलीस पोहचले असून संबंधित व्यक्तींना ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.