Hijack Threat to Air India: आज (23 फेब्रुवारी) Air India च्या मुंबई कार्यालयात विमान हायजॅक करण्याचा धमकीचा फोन खणाणल्यानंतर मुंबईसह देशभरातील सारी विमानतळ हाय अलर्ट (High Alert) वर टाकण्यात आली आहे. मुंबईसह देशभरातील विमानतळावर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. प्रत्येक प्रवाशाची कटाक्षाने तपासणी केली जात आहे. मुंबईत एअर इंडियाच्या ऑपरेशन सेंटरमध्ये आलेल्या फोनवर 'एक फ्लाइट हायजॅक करून पाकिस्तानात नेण्यात येईल.' असे सांगण्यात आले आहे. यानंतर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. पण आज आलेल्या धमकीच्या फोनमुळे ब्युरो ऑफ सिविल एव्हिएशन सिक्युरिटी (BCAS) कडून सर्व विमानतळांना खबरदारीचे निर्देश जारी केले आहेत. यामध्ये टर्मिनल आणि ऑपरेशन क्षेत्रात जाण्यापूर्वी कसून तपासणी केली जाईल. गाड्यांची तसेच प्रवासी, कर्मचारी, सामान, कॅटरिंग या साऱ्यांची अधिक कडेकोट तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. MSRTC च्या बसमधून विनापरवानगी पार्सल नेल्यास चालक-वाहक होणार निलंबीत, हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर ST अधिक सतर्क
मुंबईमध्ये लोकल ट्रेन्स, गर्दीची ठिकाणं दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याचा संकेत देण्यात आला आहे. त्यामुळे खाजगी बस, टोल नाके, रेल्वे स्थानक येथे देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मुंबई लोकलवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता; मुंबईसह महाराष्ट्रात अतिदक्षतेचा इशारा
4 फेब्रुवारी दिवशी जम्मू काश्मिरमध्ये दहशतवादी संघटनेने भारतीय सीआरपीएफ जवानांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 40 हून अधिक जवान ठार झाले. त्यानंतर काश्मिरमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी भारतीय लष्कराकडून सर्च ऑपरेशन झाले. यामध्ये तीन दहशतवादी ठार करण्यात भारताला यश आलं. जम्मू काश्मिर मधील या हल्ल्यानंतर सध्या देशभरामध्ये हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.