डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींची उडवली खिल्ली म्हणाले ' आत थँक्यू बोलू काय?'
पंतप्रधान मोदी आणि अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प | (Archived and representative images)

भारत अफगानिस्तानमध्ये (Afghanistan) एक लायब्ररी (Library)फंड करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी नुकतीच प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली होती. भारताचा हा विचार अमेरिकेला फारसा आवडला नाही. त्यामुळे भारताच्या या निर्णयाविरोधात अमेरिकेने नाक मुरडले आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड टम्प (Donald Trump ) यांनी सुद्धा या लायब्ररीवरुन पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे. भारत अफगानिस्तानमध्ये लायब्ररी उभारण्याचा विचार करते आहे. पण, तिचा वापर कोण करणार? अशा शब्दांत ट्रम्प यांनी मोदींची खिल्ली उडवली आहे.

डोनाल्ड ट्रम्प बुधवारी रात्री (2 जानेवारी) पत्रकार परिषदेच्या रुपाने प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. या वेळी विदेशात कमी होत असलेल्या अमेरिकी गुंतवणुकीच्या मुद्द्यावरुन ट्रम्प यांना विचारण्यात आले. तेव्हा काहीसा बचावात्मक पवित्रा घेत ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, 'भारत अफगानिस्तानमध्ये लायब्ररी निर्माण करत आहे. पण, तिथे त्याचा वापर कोण करणार? या लायब्ररीसाठी मी आता थँक्यू बोलू का?' पुढे बोलताना ट्रम्प म्हणाले, 'अफगानिस्तानमध्ये उभारण्यात आलेल्या लायब्ररीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी मला सातत्याने सांगत होते. आमच्या सुमारे पाच तास संवाद झाला. यात माझ्याकडून आपेक्षा करण्यात आली की, या लायब्ररीसाठी मी आभार मानावेत. पण, मला खरेच कळत नाही, तिथे लायब्ररीचा वापर कोण करणार?'. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत पंतप्रधान मोदी यांचा झालेला संवाद कोणत्या प्रकल्पाबद्दल झाला हे मात्र समजू शकले नाही. (हेही वाचा, भारत अमेरिकेला खूश करण्यासाठी व्यापारी करार करु इच्छितो: डोनाल्ड ट्रम्प)

11 डिसेंबर 2001मध्ये तालीबानी हल्ला झाला होता. त्यानंतर अमेरिकेच्या नेतृत्वाखाली लष्कराने कट्टरतावाद्यांच्या प्रभावाखाली असलेल्या अफगानिस्तानची मुक्तता केली होती. त्यावेळी भारताने अफगानिस्तानमध्ये 21,064 कोटी रुपयांची मदत करण्याचे अश्वासन दिले होते. यात काही प्रकल्पांचा समावेश होता. त्यापैकी एक म्हणजे काबुल येथे एका शाळेची उभारणी आणि प्रतिवर्ष सुमारे 1000 अफगानी मुलांना स्कॉलरशिप देण्यात येणार आहे.