File image of US President Donald Trump | (Photo Credits: Getty)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्यासाठी वाद झाल्याचे दिसून आले. एएफपी यांच्या मते, अमेरिका राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सत्तेचा दुरपयोग केल्याने महाभियोगाचा प्रस्ताव अमेरिका हाउस मध्ये 230 पैकी 197 मतांनी पास झाला आहे. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांना पुढील महिन्यात सीनेट मध्ये सुनावणीचा सामना करावा लागणार आहे. हाउस ऑफ ज्युडिशियरी कमेटी यांनी गेल्या आठवड्यात  ट्रम्प यांच्या विरोधात लावण्यात आलेल्या दोन आरोपांना मंजूरी दिली आहे. यामध्ये पहिला आरोप म्हणजे, त्यांनी युक्रेनवर 2020 च्या निवडणूकीसाठी ट्रम्प यांच्या विरोधात उभे राहणारे जो बिडेन यांना बदनान करण्यासाठी दबाब आणला होता. दुसरा आरोपात असे म्हटले आहे की,  ते कॉंग्रेसला अडथळा आणत आहेत. त्याचसोबत ट्रम्प यांनी महाभियोग तपासणीस पाठिंबा दर्शविला नाही.

अमेरिकेच्या ज्युडिशिरी यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव यांनी संयुक्त राज्य अमेरिकेचे 45 वे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर महाभियोगाच्या प्रस्तावासाठी मतदान केले आहे. तर बुधवारी हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव मध्ये जवळजवळ या प्रस्तावर 10 तास वाद झाले.(Sanna Marin बनल्या जगातील सर्वात तरुण महिला पंतप्रधान!)

ANI Tweet:

यापूर्वी ट्रम्प यांनी प्रतिनिधी सभेचे स्पीकर नैन्सी पेलोसी यांच्यावर निशाणा साधला होता. तसेच आणि डेमोक्रॅट खासदारांवर अभूतपूर्व आणि असंवैधानिक पद्धतीने शक्तींचा गैरवापर केल्याचा आरोप करीत स्वत: ला सत्ता बदलण्याच्या बेकायदेशीर, पक्षपाती प्रयत्नांचे बळी म्हणून म्हटले होते. ट्रम्प यांनी आपल्या सहा पानी संदेशात असेही लिहिले आहे की, पुढच्या वर्षी मतदारांनी मतदान केल्यावर डेमोक्रॅट त्यांच्या प्रयत्नाबद्दल पश्चाताप करतील.