Finland Youngest Prime Minister Sanna Marin(PC- Twitter)

सना मरिन (Sanna Marin) या वयाच्या 34 व्या वर्षी फिनलॅण्डच्या पंतप्रधान (Finland Youngest Prime Minister) बनल्या आहेत. सना केवळ फिनलॅण्डच्या राजकीय इतिहासातचं नव्हे तर जगातील सर्वात तरुण पंतप्रधान ठरल्या आहेत. सना याआधी परिवहन आणि दूरसंचारमंत्रीही होत्या. सना मरीन या फिनलंडच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान असतील. विशेष म्हणजे त्यांना एक 22 महिन्यांची मुलगीसुद्धा आहे. सोशल डेमोक्रॅटिक पार्टी या देशाच्या सत्ताधारी पक्षाने अँटी रिनी यांच्या राजीनाम्यानंतर सना मरिन यांची निवड केली आहे. दरम्यान, 'नवी जबाबदारी स्वीकारण्यासाठी मी पूर्णत: तयार आहे', असं सना मरिन यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - Miss Universe 2019: दक्षिण आफ्रिकेची सौंदर्यवती Zozibini Tunzi ने पटकावला ‘मिस युनिव्हर्स 2019’ चा किताब)

सध्या जगातल्या सर्वांत तरुण महिला नेत्यांमध्ये युक्रेनचे अध्यक्ष ओलेक्सी होंचारुक (वय, 35 वर्ष) आणि न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन (39 वर्ष) यांची नावं होती. परंतु, आता सना मरिन या जगातील सर्वात तरुण पंतप्रधान ठरल्या आहेत.

कोण आहेत सना मरीन?

सना मरिन यांचा जन्म 16 नोव्हेंबर 1985 मध्ये फिनलॅण्डमध्ये झाला. 2012 मध्ये टॅम्पियर युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी राज्यशास्त्राची पदवी घेतली. यानंतर त्या राजकारणात सक्रिय झाल्या. 2015 मध्ये सना पहिल्यांदा संसदेच्या सदस्य झाल्या. त्यानंतर 2017 मध्ये त्यांची सिटी काऊन्सिलमध्ये निवड झाली. तसेच 2019 मध्ये सना पहिल्यांदा सरकारमध्ये सहभागी झाल्या आणि त्यांनी परिवहन आणि दूरसंचार मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली.