अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्र्म्प (US President Donald Trump) यांची आज कोविड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी Walter Reed National Military Medical Center मध्ये दाखल करण्यात आले मात्र आता 4 दिवसांच्या उपचारांनंतर डॉनल्ड ट्रम्प व्हाईट हाऊस वर परतले आहेत. अजूनही ट्र्म्प कोविड 19 आजारातून पूर्णपणे बाहेर पडलेले नाहीत मात्र त्यांना डिस्चार्ज देण्यासाठी आवश्यक असलेला प्रोटोकॉल त्यांनी पूर्ण केला असल्याचं सांगण्यात आले आहे. दरम्यान व्हाईट हाऊस वर परतताच त्यांनी एक खास व्हिडिओ शेअर करत अमेरिकेतील नागरिकांसाठी खास व्हिडीओ संदेश शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी कोविड 19 आजाराला घाबरू नका. आपल्याकडे जगातील उत्तम औषधं आहेत. कोरोना व्हायरसला तुमच्यावर अधिराज्य मिळवू देऊ नका लवकरचं सारं सुरळीत होईल अशी ग्वाही देत त्यांनी Walter Reed National Military Medical Center च्या डॉक्टर, नर्स आणि अन्य कर्मचार्यांचे आभार मानले आहेत.
डॉनल्ड ट्रम्प यांचे सल्लागार होप हिकचा कोविड 19 अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ट्र्म्प दांपत्याची तातडीने टेस्ट करण्यात आली होती. 2 ऑक्टोबरला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्र्म्प यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाले. यानंतर त्यांना आयसोलेट करण्यात आले तसेच रेमडिसिव्हरचा डोस सुरू करण्यात आला.
डॉनल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसवर
— Donald J. Trump (@realDonaldTrump) October 5, 2020
अमेरिकन नागरिकांसाठी संदेश
— Donald J. Trump (@realDonaldTrump) October 5, 2020
डॉनल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसवर परताच एक स्पेशल व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी कोरोना व्हायरस बाबत मागील 4 दिवसांत बरंच काही शिकलो आहे. कोविड 19 च्या 4 दिवसांच्या उपचारांनंतर तब्येतीमध्ये सुधारणा झाली आहे. 20 वर्षांपूर्वीपेक्षा देखील आता मला ठीक वाटत आहे. असे सांगताना जगातील उत्तम औषधं अमेरिकेकडे उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान White House physician Dr Sean Conley यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉनल्ड ट्र्म्प यांनी डिस्चार्जसाठी आवश्यक सार्या गोष्टी पूर्ण केल्या आहेत. पण अजूनही ते आजारपणातून पूर्ण बाहेर पडलेले नाहीत. त्यांच्यासाठी व्हाईट हाऊसवर 24X7 मेडिकल टीम करत आहे. तर Reuters ने दिलेल्या माहितीनुसार, डॉनल्ड ट्रम्प यांना रेमडिसिव्हरचा पाचवा डोस व्हाईट हाऊसमध्ये दिला जाईल. त्यांची ऑक्सिजन पातळी स्थिर आहे.