yoga Pic (Photo Credits: PixaBay)

नियमित योगा केला पाहिजे, असा सल्ला अनेकजण आपणांस देत राहतात. योगा केल्याने आपले शरीर लवचिक आणि तंदरुस्त होते. महत्वाचे म्हणजे योगा केल्याने अनेक अजारांपासून दूर राहता येते. परंतु मेक्सिकोतील एका तरुणीला योगा करणे भलतेच महागात पडले आहे. बाल्कनीत योगाचे आसन करताना तिला तोल गेला आणि ती ८० फूट खाली कोसळली. या अपघातात तिला मोठी जखमी झाली असून तिला किमान तीन वर्षे बरे होण्यासाठी लागणार आहे.

अलेक्सा टेरेझा असे या मुलीचे नाव आहे. मेक्सिकोतील सॅन पेड्रो येथे ती राहते. अलेक्सा ही विद्यार्थीनी आहे. घरी आलेल्या मित्रांना नव्या पद्धतीचे योगा आसन करुन दाखवत होती. या दरम्यान तिचा तोल गेला आणि ती खाली कोसळली. तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात अलेक्साला गंभीर दुखापत झाली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अलेक्सा ही ८० फूटाच्या उंचीवरुन पडल्यामुळे तिच्या शरिरातील ११० मोडली गेली. यात तिच्या पायाला जबर दुखापत झाली आहे. तब्बल ११ तास तिच्यावर सर्जरी चालू होती. धक्कादायक बाब म्हणजे तिला स्वत:च्या पायावर उभा राहण्यासाठी किमान ३ वर्षाचा कार्यकाळ लागणार आहे. हे देखील वाचा-Amazon Fires: पत्नीची खिल्ली उडवल्याबद्दल फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष Emmanuel Macron यांच्याकडून ब्राझीलचे राष्ट्राध्याक्ष Jair Bolsonaro यांचा निशेध

तिची डोक्यापासून पायापर्यंतची ११० हाडे मोडली आहेत. तिच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर रक्ताचीही मागणी केली असल्याचे वृत्त डेली मेलने दिले आहे. सध्या अलेक्सा धोक्यापासून दूर आहे. परंतु काही काळासाठी अपंगत्व आले आहे.