Amazon Fires: पृथ्वीचं फुफ्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अॅमेझॉन जंगलाला लागलेली आग अद्यापही धुमसत आहे. या आगीमुळं अवघं जग चिंतेत आहे. दरम्यान, या आगीच्या नियंत्रणावरुन सुरु झालेला दोन देशांच्या राष्ट्राध्यक्षांतील वाद व्यक्तिगत पातळीला पोहोचला आहे. हा वाद ब्राझील (Brazil) देशाचे राष्टाध्यक्ष Jair Bolsonaro आणि फ्रान्स (France) या देशचे राष्ट्राध्यक्ष Emmanuel Macron (इमैन्युअल मैक्रों ) यांच्यात घडला. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षाच्या पत्नी ब्रिगित मैक्रों (Brigitte Macron) यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली. या टिप्पणीचा Emmanuel Macron यांनी तीव्र शब्दात निशेध केला.
फ्रान्समध्ये नुकतीच बिआरित्ज G-7 परिषद पार पडलीय या परिषदेस ब्राझीलचे राष्ट्रपतीही हजर होते. या संमेलनादरम्यानच्या छायाचित्रांवर काही लोकांनी सोशल मीडियात मिम्स बनवले. यातील एका मीम्समध्ये इमैन्युअल मैक्रों अपली पत्नी ब्रिगेट मैक्रोंहिच्यासोबत उभे आहेत. मिम्समधील याच फोटोच्या एका भागात ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो आपल्या पत्नीसोबत उभे असल्याचे दिसते. सोशल मीडिया युजर्सनी दोन्ही नेत्यांच्या पत्नीची तुलना करत लिहिले की, इमैन्युअल मैक्रों काहीसे जलस फिल करताना दिसत आहेत. काहींनी म्हटले की, आपण समझू शकता की मैक्रों बोल्सनारो यांच्या मागे इतके का लागले आहेत? (हेही वाचा, व्हिडिओ: न्यूजीलैंड संसदेचं कामकाज सुरु असताना अध्यक्षांनी खेळवलं खासदाराचं बाळ, त्याला दूधही पाजले)
दरम्यान, फेसबुक पोस्टवर ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोल्सोनारो यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, 'माणसाची बेईज्जत करु नका... हा हा'. बोल्सोनारो यांच्या या टिप्पणीमुळे इमैन्युअल मैक्रों प्रचंड नाराज झाले. ते म्हणाले, इमैन्युअल मैक्रों (Emmanuel Macron) यांनी सोमवारी बिआरित्ज येथे बोलताना सांगितले की, त्यांनी (Jair Bolsonaro) माझ्या पत्नीबद्दल अभद्र शब्दांत टिप्पणी केली आहे. या वर मी काय बोलू? त्यांचे वक्तव्य अत्यंत खेदजनक आहे. त्यांचे वक्तव्य ब्राझीलच्या नागरिकांसाठीही खेदजनक आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, फ्रान्सच्या राष्ट्रपतींची पत्नी ब्रिगेट मैक्रों 66 वर्षांची असून, इमैन्युअल मैंक्रो यांच्यापेक्षा काही वर्षांनी मोठीही आहे.