Kamala Harris hosts Diwali at her residence (Photo Credits: X/@KevinThomasNY)

Kamala Harris Celebrates Diwali 2023: अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि पती डग एमहॉफ यांनी त्यांच्या निवासस्थानी दिवाळी (Diwali 2023) बुधवारी (9 नोव्हेंबर) साजरी केली. या वेळी त्यांच्यासोबत न्यूयॉर्क राज्याचे सिनेटर केविन थॉमस सुद्धा दिवाळीच्या आनंदात सहभागी झाले. सिनेटर थॉमस यांनी एक्स हँडलवरुन शेअर केलेल्या पोस्टचा मराठी भावार्थ असा की, कमला हॅरीस आणि त्यांच्या पतीसोबत दिवाली साजरी करणे हा माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. आपली दिवाळी अंधारमुक्त आणि प्रकाशाने भरभरून जावो. दिवाळीच्या शुभेच्छा! असे म्हटले आहे.

दिवाळी साजरी कण्यासाठी जमलेल्या उपस्थितांना उद्देशून बोलताना कमला हॅरीस म्हणाल्या, या वेळी दिवाळी हा सण अशा वेळी साजरा केला जात आहे, जेव्हा जगभरात खूप साऱ्या घटना घडत आहेत. मला वाटतं की आपण दिवाळी साजरी करतो, जी आपल्याला अपेक्षीत असलेला प्रकाशआहे. जो नेहमीच समजून घेण्याचा संदर्भ असतो. आपण ज्या अंधारमय क्षणाला तोंड देत आहोत त्यामध्ये आव्हानात्मक गोष्टी आहेत. पण मला माहिती आहे त्यातून आपण लवकरच बाहेर पडू. विशेषत: इस्रायलमधून समोर येत असलेल्या घटना आणि त्याबाबतचे अहवाल सर्वांसाठीच भीतीदायक आहेत. अनेकांसाठी ते विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत. कमला हॅरीस यांच्या वक्तव्याबाबत दक्षिण आशियाई टीव्ही नेटवर्कचा एक भाग असलेल्या एका टीव्ही चॅनलने हे वृत्त दिले आहे.

एक्स पोस्ट

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तामध्ये कमला हॅरीस यांनी म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष अध्यक्ष जो बिडेन आणि मी स्वतः इस्रायलचा बचाव करण्याच्या अधिकाराचे समर्थन करण्यासाठी काम करत आहोत. अशा वेळी आम्ही दिवाळी साजरी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण ती अंधारावर मात करणारी आणि प्रकाश दाखवणारी आहे. सोबतच ती खऱ्याची साथ देणारीही आहे. दरम्यान, कमला हॅरीस यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी भारतीय-अमेरिकन उद्योजक अजय जैन भुतोरिया हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

एक्स पोस्ट

दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. या सणाला दीपावली देखील म्हटले जाते. असे मानले जाते की, हा सण अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि स्वातंत्र्य आणि ज्ञानाचा आशीर्वाद, विजय साजरा करतो. दिवाळी हे नाव संस्कृत दीपावलीवरून आले आहे, ज्याचा अर्थ "दिव्यांची रांग" आहे. दिवाळीच्या रात्री, साजरे करणारे डझनभर पणत्या आणि मातीचे दिवे पेटवतात, ते त्यांच्या घरात आणि रस्त्यांवर अंधारलेली रात्र उजळून टाकतात. हिंदू संस्कृतीमध्ये दिवाळीला अनन्य साधारण महत्त्व आहे.