अमेरिकेत सत्तांतर झाले असून डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन (Joe Biden) राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाले आहेत तर कमला हॅरिस (Kamala Harris) उपराष्ट्राध्यक्षपदाची सुत्रं सांभाळणार आहेत. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांच्या विजयानंतर तामिळनाडू येथील त्यांच्या मुळ गावी थुलेंद्रपुर मध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे. मतमोजणी दरम्यान हॅरीस यांचे मुत्सद्दी आजोबा पीव्ही गोपालन यांनी तामिळनाडू येथील वडिलोपार्जित घरात विशेष प्रार्थनेचे आयोजन केले होते. दरम्यान, कमला हॅरिस यांच्या विजयाने अमेरिकेच्या राजकारणात इतिहास रचला आहे. ब्लॅक आणि दक्षिण आशियाई असूनही त्यांनी पहिल्या महिला उपाध्यक्ष होण्याचा मान पटकावला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये जो बायडन यांनी उपाध्यक्षपदासाठी कमला हॅरिस यांचे नाव सुचवले होते.
कमला हॅरिस यांचा विजय साजरा करण्यासाठी गावात पोस्टर्स लावण्यात आली आहेत. त्याचबरोबर रांगोळ्या काढून, फटाके फोडून हा आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. मंगळवारी त्यांच्या विजयासाठी एका विशेष पूजेचे देखील आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर मंदिरातील अभिषेकात सहभागी झाल्याने कमला यांची लोकप्रियता अधिकच वाढली आहे. (Kamala Harris nominated for US Vice President: 'भारतीय समुदायासाठी हा ऐतिहासिक दिवस' म्हणत कमला हॅरिस यांचे मामा गोपालन बालाचंद्रन यांनी व्यक्त केला आनंद)
ANI Tweet:
Tamil Nadu: People in Thulasendrapuram, the native village of US Vice President-elect Kamala Harris celebrate her #USElection win by putting up posters, distributing sweets and burning firecrackers. https://t.co/pmd7P3xkjI pic.twitter.com/Aa7mVVQIwP
— ANI (@ANI) November 8, 2020
रिपब्लिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करुन डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत नेत्रदीपक विजय मिळवला. बायडन हे अमेरिकेचे 46 वे राष्ट्रपती असून 20 जानेवारी 2021 रोजी ते पदभार स्वीकारणार आहेत. या निवडणुकीत बायडन यांना 273 जागा मिळाल्या असून ट्रम्प यांना 214 जागांवर विजय मिळवण्यात यश आले आहे.