भारतात (India) मोसमी पावसाचा (Daily Mansoon) मुक्काम लांबल्यामुळे आस्ट्रेलियात (Australia) वणवे पटले आहेत. यात ३ जण ठार झाली असून तब्बल १५० घरे जळून खाक झाली आहे. या वर्षी भारतात विक्रमी असा पाऊस झाला. महत्वाचे म्हणजे, भारतात पाऊस हा जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत बरसत असतो. सप्टेंबरनंतर मोसमी वारे दक्षिणेकडे वळतात. मात्र, यावर्षी आस्ट्रेलियात योग्य वेळेत आला नाही. पावसाअभावी हा भाग कोरडा पडला असून उष्णता वाढून वारे वाहत असल्याने न्यू साऊथ वेल्स येथे अभूतपूर्व वणवे लागले आहे. दरम्यान, लाखो हेक्टर जमीनीचे नुकसान झाले असून हजारो लोक यात विस्थापित झाले आहेत.
"भारतात यंदा मोसमी पाऊस विक्रमी झाला आणि बराच काळ तो तिथेच थांबला. भारतात गेल्या महिन्याच्या मध्यावधीपर्यंत मोसमी पाऊस सुरूच होता. आशियातील नैऋत्य मोसमी पाऊस हा जून ते सप्टेंबर दरम्यान चालतो व नंतर मोसमी वारे तेथून दक्षिणेकडे वळतात. पण भारतात मोसमी पाऊस लांबल्याने डार्विन शहरात पावसाला विलंब होऊन पूर्व किनारा कोरडा पडला. त्यामुळे तो वणवेप्रवण भाग बनला. सध्या न्यू साऊथ वेल्स येथे अभूतपूर्व वणवे लागले असून तीन लोक ठार तर १५० घरे जळून गेली आहेत",असे मत मेलबर्न विद्यापीठातील वणवेविषयक तज्ज्ञ ट्रेनट पेनहॅम यांनी व्यक्त केले आहे. हे देखील वाचा- Viral Video: पहा समुद्रात 'व्हेल' मासा चक्क तरुणासोबत खेळतोय ‘कॅच-कॅच’!
भारतात या वर्षीच्या पावसाने सर्वांनाच झोडपून काढले. भारतासह ऑस्ट्रेलियातील नागरिकांनाही याचा फटका बसला आहे. डो गेल्या १० वर्षाच्या तुलनेत प्रथमच वणव्यांची धोकापातळी अधिक आहे. प्रादेशिक अग्निशमन सेवेचे अँथनी क्लार्क यांनी सांगितले की, वणव्यांमुळे आगामी काळात भीषण स्थिती असेल यात शंका नाही.