इंडोनेशिया (Photo Credits: Twitter)

Indonesia Tsunami: इंडोनेशियामध्ये (Indonesia) शनिवारी रात्री ज्वालामुखीचा उद्रेक (ANAK KRAKATAU Volcano) आलेल्या त्सुनामीने सारं जनजीवन विस्कळीत झालं आहे. आज सकाळपर्यंत या भीषण त्सुनामीने सुमारे 281 लोकांचे बळी घेतले आहेत, तर 1000 हून अधिक लोकं जखमी आहेत. अनेक लोकं बेपत्ता आहे. इंडोनेशियामध्ये अजूनही ज्वालामुखी धगधगता असल्याने भविष्यात पुन्हा त्सुनामीचा धोका असल्याचा इशारा देण्यात आला आहे. आपत्कालीन नियंत्रण विभागाकडून नागरिकांना समुद्र किनार्‍यापासून दूर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी या दुर्घटनेमध्ये बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहताना इंडोनेशियन नागरिकांना धीर ठेवण्याचं आवाहन केलं आहे. क्रेकाटोआ (ANAK KRAKATAU Volcano) ज्वालामुखी 2 मिनिटं 12 सेकंद फुटल्यानंतर भूसख्खलन झाले. यानंतर इंडोनेशियाला त्सुनामीचा फटका बसला.

तानजुंग लेसुंग बीच रिसॉर्ट सह अनेक लोकप्रिय भागामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं आहे. रिसॉर्टमध्ये रॉक बॅन्ड 'सेवेंटीन' परफॉर्म करत असतानाच त्सुनामी येऊन धडकली.त्यामध्ये हा बॅंड वाहुन गेला.

जावाच्या पाडेंलांग या पर्यटन ठिकाणी 266 हून अधिक तर सुमात्रा च्या साऊथ लामपुंग़ या ठिकाणी 48 लोकांचा मृत्यू झाला आहे. अधिकर्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार इंडोनेशियामध्ये अजून विदेशी नागरिक मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर आलेली नाही.