विचित्र! नशा करण्यासाठी 'या' देशातील तरुण करतायत सॅनिटरी पॅडचा वापर
सॅनिटरी पॅड्स नशा ( फोटो सौजन्य- फेसबुक )

बदलत्या काळानुसार जगात अनेक घडामोडी सातत्याने होत आहेत. तसेच नशा करणाऱ्यांचे जीवन तर सामान्य व्यक्तींपेक्षा फारच वेगळे असते. तर नशा करणारी लोक या व्यसनाचा एवढी आहारी जातात की त्यांना दुसरे काही सुचतच नाही. त्यामुळे या देशातील तरुण मंडळी नशा करण्यासाठी चक्क सॅनिटरी पॅडचा वापर करताना सध्या दिसून येत आहेत.

एका वृत्ताकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंडोनियामधील तरुण मंडळी ही स्वस्त नशा करताना आढळून आले आहेत. तसेच ही तरुण मंडळी कचऱ्याच्या ठिकाणी वापरलेले सॅनिटरी पॅड शोधून ते पाण्यात उकळवतात. त्यानंतर उकळवलेल्या त्या पाण्याचे सेवन केल्याने त्यांना एक वेगळीच नशा अनुभवायला मिळत आहे. तसेच या नशेबद्दल एका तरुणाला विचारले असता त्याने असे सांगितले की, ही नशा केल्याने मला वेगळेच वाटत असून मी हवेवर तरंगत असल्याचा भास होतो. तर नॅशनल नारकोटिक्स कंपनीचा एक वरिष्ठ कमांडरचे असे म्हणणे आहे, या सॅनिटरी पॅडमध्ये असलेला सोडियम पॉलिक्राइलेट मुख्य घटक असून तो ओलावापणा खेचून घेण्याचे काम करतो.

तर इंडोनेशिया चाईल्ड प्रोटेक्शन कमिशनचे सदस्य सिट्टी हिकमावट्टी यांनी तरुण करत असलेली नशा ही स्वस्त मार्गाने सहज उपलब्ध होते असे सांगितले आहे. त्यामुळे तरुण मंडळींच्या आरोग्यावर फार मोठा परिणाम होताना दिसून येत आहे.