COVID-19 Pandemic: UAE स्थित CNG Company भारतासाठी करणार Oxygen Cylinders निर्मिती
Oxygen Cylinders | (File Photo)

संयुक्त अरब अमीराती (UAE ) स्थित एक भारतीय कंपनी कंप्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) सिलिंडर निर्मिती ऐवजी ऑक्सिजन सिलिंडर (Oxygen Cylinders) निर्मिती करणार आहे. भारतात कोरोना व्हायरस महामारी (COVID-19 Pandemic) संकटामुळे निर्माण झालेल्या ऑक्सिजन तुटवड्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. गल्फ न्यूजचा हवाला देत वृत्तसंस्था आयएनएसने याबाबत वृत्त दिले आहे. कंपनी इकेसी इंटरनॅशनल एफजेडीई प्रबंध निदेशक, पुष्कर खुराना यांनी म्हटले आहे की, आम्ही एक भारतीय सहाय्यक कंपनी आहोत. आम्हाला जसेही कळले की भारतात ऑक्सीजन सिलेंडर तुटवड्याबाबत माहिती मिळाली. तेव्हा आम्ही आपल्या देशासाठी आवश्यकतेनुसार ऑक्सिजन निर्मितीचा निर्णय घेतला आहे.

कंपनीने पुढे म्हटले आहे की, मार्च महिन्यापासून कंपनीने गुजरातमध्ये पोर्ट दुंद्रा येथे सिलेंडरचे कंटेनर निर्यात केले आहेत. आम्ही गॅस सिलिंडर बनवतो. आखाती देशातील औद्योगिक गॅस कंपन्यांना जसे की, मीरात औद्योगिक गॅस कंपनी (EIGC) आणि आखादी उद्योजकांद्वारा ऑक्सीजन भरले जातात. पुढे ते पोर्ट मुंद्रा येथे पाठविण्यात येतात. प्रत्येक कंटेनरमध्ये 50 लीटर क्षमतेचे सुमारे 350 सिलेंडर असतात. मार्च आणि एप्रिलमध्ये कंपनीन सुमारे 6,000 ऑक्सीजन सिलेंडर पाठवले आहेत. मेमध्य ही संख्या वाढवून 7,000 इतकी करण्यात आली आहे. (Coronavirus: कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी भारतामध्ये लॉकडाऊन लागू करणे गरजेचे; अमेरिकेचे Epidemiologist Anthony Fauci यांचे मत)

खुराना यांनी पुढे सांगितले की, कोविड संक्रमित लोकांचे जीवन महत्त्वपूर्ण आहे. आम्ही या संकट काळात कर्तव्य भावनेने पाहतो. आम्ही आतापर्यंत ऑक्सीजन सिलेंडरचे उत्पादन करत आलो. यापुढेही जोपर्यंत भारताला त्याची आवश्यकता आहे तोपर्यंत आम्ही ऑक्सिजन निर्मिती करत राहू असे या कंपनीने म्हटले आहे. के. एन. भारतमध्ये कांटो सिलिंडर लिमिटेडची सहाय्यक कंपनी आहे. या कंपनीचे सेल्स मॅनेजर कुट्टी यांनी म्हटले की, युएईची गुंतवणूक 2002 पासून प्रकृतिक गॅस वाहन (NVG) आणि औद्योगिक सिलेंडर(CNG) निर्मिती करते. मात्र आता ही कंपनी ऑक्सिजन निर्मिती करते आहे.