COVID-19 रुग्णाला हाताळण्यासाठी प्रभावी ठरू शकतात 'ही' 69 ड्रग्ज, येथे पाहा यादी
Coronavirus: Medical workers (Photo Credits: IANS)

संपूर्ण जग ज्या कोरोना व्हायरस (Coronavirus) हा जीवघेण्या विषाणू विरुद्ध लढत आहे, त्याला नियंत्रणात आणण्यासाठी जगभरातील प्रसिद्ध तज्ज्ञ युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. हा आजार इतका गंभीर आहे की यावर योग्य तो इलाज न झाल्यास रुग्णाचा जीवही जाऊ शकतात. शिवाय या रुग्णाच्या संपर्कात येणा-या व्यक्तीचा देखील जीव जाऊ शकतो. जगभरात आतापर्यंत 14,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर यावर काही ठोस उपाय शोधता यावा यासाठी जगभरातील तज्ज्ञांची टीम कामाला लागली आहे. यात आतापर्यंत केलेल्या निरीक्षणात 69 प्रकारचे ड्रग्ज कोरोना ग्रस्त रुग्णावर इलाज करताना फायदेशीर ठरू शकतील असे तज्ज्ञांचे मत आहे.

या 69 ड्रग्जपैकी काही औषधे ही कोरोना बाधितांना देण्यात येत आहेत. याशिवाय या रोगासाठी लागणारी 69 ड्रग्जची यादी bioRxiv. या वेबसाइटवर मिळेल. मोठमोठ्या संशोधकांनी यावर अभ्यास करत असताना कोरोना व्हायरसच्या जनुकांचा देखील अभ्यास केला. याला SARS-CoV-2 असेही म्हणतात. अभ्यासादरम्यान, शास्त्रज्ञांनी कोरोनाव्हायरसच्या 29 जनुकांपैकी 26 जीन्सची तपासणी केली, जी विषाणूजन्य प्रथिनांचे थेट उत्पादन करते. ज्यामध्ये 332 मानवी प्रथिने लक्ष्य असतात. त्यामुळे अशा विषाणूंविरुद्ध लढण्यासाठी मानवी शरीरात प्रतिकृती तयार करण्याची आवश्यकता असते. Coronavirus: लॉकडाउनची परिस्थिती नागरिकांनी गांभीर्याने घेण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागरिकांना आवाहन

संशोधकांनी केलेल्या संशोधनात यातील 24 ड्रग्ज हे अन्न आणि औषधे विभागाकडून प्रमाणित करण्यात आली आहेत. यातील काही ड्रग्ज मलेरियावर देखील वापरण्यात येते.

सध्या जगभरात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 3 लाखांच्या वर गेला असून यात 14,654 लोक मृत्यूमुखी पडले आहेत. या मृतांपैकी 5,476 लोक हे इटलीतील आहे. इटलीसाठी हा खूपच चिंताजनक विषय असून सर्व शासकीय यंत्रणा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत.

देशभरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 300 पेक्षा अधिक झाला आहे. तर गुजरात राज्यात कोरोना व्हायरसच्या पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडावर पोहचला असून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. येत्या 31 मार्च पर्यंत दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश यांच्यासह अन्य ठिकाणी सुद्धा लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहेत.