चीन मधील वुहान शहरातून लागण झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात आपले जाळे परसवले आहे. कोरोनामुळे सर्वाधिक मोठा फटका अमेरिका, इटली, जपान सारख्या बड्या देशांना बसला आहे. तर जगभरात कोरोना व्हायरसच्या संक्रमितांचा आकडा 5.7 मिलियन वर पोहचला आहे. त्याचसोबत बळींचा आकडा 355,000 च्या पार गेल्याची माहिती जॉन हाॅपकिन्स युनिव्हर्सिटी यांनी दिली आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतेही ठोस औषध उपलब्ध नाही आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी जगभरातील वैज्ञानिक त्यासंबंधित लसीबाबत संशोधन करत आहेत. तसेच डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत.
अमेरिका हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. त्यामुळे येथे कोरोनामुळे बळींचा आकडा 1 लाखांच्या पार गेला आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी यांच्या मते, हा आकडा जगातील सर्वाधिक बळींचा आकडा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. जेथे देशात एकूण 22 टक्के प्रकरणे आहेत. तेथे न्यूयॉर्क येथे कोरोनाचे जवळजवळ 30 हजार जणांचा बळी गेला आहे.(Coronavirus in US: कोरोना व्हायरसमुळे 1 लाखाहून अधिक मृत्यू झालेला अमेरिका ठरला पहिला देश; जाणून घ्या संक्रमित रुग्णांची आकडेवारी)
The overall number of global #coronavirus cases was nearing the 5.7 million mark, while the deaths have increased to more than 355,000, according to the #JohnsHopkinsUniversity. pic.twitter.com/wi7A7qOF3O
— IANS Tweets (@ians_india) May 28, 2020
अमेरिकेत दिवसागणिक कोरोनाची परिस्थिती महाभयंकर होत आहे. अमेरिकेत कोरोनामुळे बळींचा आकडा हा 1 लाखांचा पार गेला आहे. देशात आतापर्यंत मृतांचा आकडा 100,396 वर पोहचला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मते अमेरिकेत कोविड19 मुळे गेल्या 24 तासात 16,700 नवी प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 17.3 लाख पर्यंत गेला आहे. आतापर्यंत 3 लाख 72 हजार जणांची प्रकृती सुधारली आहे. संपूर्ण जगात जवळजवळ एक तृतीयांश कोरोनाचे रुग्ण अमेरिकेत आहेत. न्यूयॉर्क, न्यूजर्सी, कॅलिफोर्निया येथे कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.