जगभरातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिवर्सिटी ने दिलेल्या आकडेवारीनुसार जगभरातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या तब्बल 90 लाखांच्या घरात पोहोचली आहे. तर या आजारामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 467,000 पेक्षाही अधिक झाली आहे. युनिवर्सिटीच्या सेंटर फॉर सिस्टम्स सायन्स अॅण्ड इंजीनियरिंग (CSSE) ने सोमवारी (22 जून 2020) सकाळी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार जगभरातील कोरोना व्हायरस संक्रमित एकूण रुग्णांची संख्या 8,927,195 इतकी आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 467,636 इतकी झाली आहे.
सीएसएसईने दिलेल्या आकडेवारीनुसार कोरोना व्हायरस संक्रमित 2,279,306 रुग्ण आणि 119,967 मृत्यूंसह अमेरिका जगात प्रथम क्रमांकावर आहे. अमेरिकेखालोखाल 1,083,341 कोरोना रुग्ण आणि 50,591 मृत्यूंसह ब्राझिल दुसऱ्या क्रमांकावर आहे. (एका दिवसात जगभरात किती रुग्ण वाढले घ्या जाणून...)
जगभरातील देशांची कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची आकडेवारी
- अमेरिका -2,279,306
- ब्राझिल-1,083,341
- रशिया-583,879
- भारत- 410,461
- इंग्लंड- 305,803
- पेरू- 251,338
- स्पेन- 246,272
- चिली- 242,355
- इटली- 238,499
- ईरान- 204,952
- फ्रांस- 197,008
- जर्मनी- 191,272
- तुर्की- 187,685
- मेक्सिको-180,545
- पाकिस्तान- 176,617
- सऊदी अरब -157,612
- बांग्लादेश- 112,306
- कॅनडा- 103,078
जगभात कोरोना व्हायरस संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 10 हजारांहून अधिक असलेल्यांमध्ये इंग्लंड(42,717), इटली (34,634), फ्रान्स (29,643), स्पेन (28,323), मेक्सिको (21,825) आणि भारत (13,254) या देशांचा समावेश आहे.