जगभरातील कोरोना व्हायरस (Johns Hopkins University) रुग्णांच्या संख्येत वाढ होणे अद्यापही सुरुच आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus) म्हणजेच कोविड 19 रुग्णांची जगभरातील संख्या 83 लाखांहूनही अधिक झाली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची जगभरातील संख्या 448,000 पेक्षाही अधिक आहे. जॉन्स हॉपकिंस यूनिवर्सिटी संचलीत सेंटर फॉर सिस्टम साइंस अॅण्ड इंजीनियरिंग (CSSE) ने गुरुवारी (18 जून 2020) सकाळी ही आकडेवारी जाहीर केली.
सीएसएसई( CSSE) ने दिलेल्या आकडेवारीनुसार कोरोना व्हायरस संक्रमित देशांच्या तुलनेत अमेरिका जगात वरच्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत कोरोना संक्रमित रुग्णसंख्या 2,162,851 इतकी आहे. तर कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 117,713 इतकी आहे. मृत्यूच्या संख्येचा अमेरिकेतील आकडा जगात सर्वाधिक आहे. अमेरिकेखालोखाल ब्राझिल दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझिलमध्ये कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 955377 इतकी आहे. ब्राझिलमध्ये आतापर्यंत 46,510 नागरिकांचा कोरोनामुळ मृत्यू झाला आहे. (हेही वाचा, बीजिंग एअरपोर्टतर्फे 1,255 उड्डाणे रद्द; चीनमध्ये कोरोना व्हायरसची नवी लाट येण्याच्या भीतीपोटी घेतला निर्णय)
विविध देशातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्ण आकडेवारी
- अमेरिका- 2,162,851
- ब्राझिल-955377
- रशिया- 552,549
- भारत- 354,065
- युनाटेड किंग्डम (युके)- 300,717
- स्पेन- 244,683
- पेरु- 240,908
- इटली- 237,828
- चिली- 220,628
- ईरान - 195,051
- फ्रांस-194,805
- जर्मनी- 188,604)
- तुर्की- 182,727
- मैक्सिको- 159,793
- पाकिस्तान-154,760
- सऊदी अरब-141,234
- कॅनाडा- 101,491
सीएसएसई( CSSE) ने दिलेल्या आकडेवारीनुसार कोरोना व्हायरस संसर्गामुळे सर्वाधिक मृत्यू झालेल्या देशांमध्ये 10,000 पेक्षा अधिक मृत्यूसंख्या असलेल्या देशामध्ये इंग्लंड (42,238), इटली (34,448), फ्रान्स (29,578), स्पेन (27,136), मैक्सिको (19,080) आणि भारत (11,903) या देशांचा समावेश आहे.