Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस जगभरात धुमाकूळ घालत आहे. जगभरात आतापर्यंत सुमारे 54 लाखांहून अधिक नागरिकांना कोरोना व्हायरस संक्रमन झाले आहे. तर, 3 लाख 45 हजारांहून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने याबाबत माहिती दिली. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ संचलीत सेंटर फॉर सिस्टम सायन्स अॅण्ड इंजीनियरिंग (CSSE) ने सोमवारी सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार जगभरात कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 54 लाख 06 हजार 537 इतकी आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या 3 लाख 45 हजार 036 इतकी आहे.

कोरना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशात अमेरिका अव्वल आहे. अमेरिकेत 97 हजार 711 नागरिकांचे प्राण कोविड 19 म्हणजेच कोरोना व्हायरसमुळे गेले आहेत. तर, आतापर्यंत 16 लाख 43 हजार 098 नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची नोंद आहे. दरम्यान, आजघडीला कोरोना व्हायरस संक्रमनात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या देशाचे नाव आहे ब्राझील. या देशात आतापर्यंत 3 लाख 63 हजार 211 कोरोना रुग्ण आहेत. तर 3 लाख 44 हजार 481 रुग्णांसह रशिया तिसऱ्या क्रमांकावर आहेत. (हेही वाचा, भूकंप होत असताना देखील टीव्ही चॅनेलला मुलाखत देत होत्या न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न, पाहा काळजाचा ठोका चुकविणारा व्हिडिओ)

विविध देशातील कोरोना रुग्णांची संख्या

अमेरिका- 16 लाख 43 हजार 098

ब्राझिल- 3 लाख 63 हजार 211

रशिया- 3 लाख 44 हजार 481

इग्लंड- 2 लाख 60 हजार 916

स्पेन- 2 लाख 35 हजार 772

इटली- 2 लाख 29 हजार 858

फ्रान्स- 1 लाख 82 हजार 709

जर्मनी- 1 लाख 80 हजार 328

तुर्की- 1 लाख 56 हजार 827

भारत - 1 लाख 56 हजार 827

इराण - 1 लाख 35 हजार 701

पेरु - 1 लाख 19 हजार 959

सीएसईने दिलेल्या आकडेवारीनुसार जगभरातील देशांवर नजर टाकता कोरोनामुळे मृत्यू झालेल्या देशांच्या यादीत अमेरिका प्रथम, इंग्लंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडमध्ये 36 हजार 875 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या 10 हजारहून अधिक असलेसल्या देशांमध्ये इटली (32 हजार 785), स्पेन (28 हजार 752), फ्रान्स (28 हजार 370) आणि ब्राझिल (22 हजार 666) या देशांचा समावेश आहे.