कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) विळख्यात अडकलेल्या अमेरिकेत (America) मागील 24 तासात कोरोनामुळे 1,450 जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. तसेच कोरोना बाधितांचा आकडा हा 11 लाखांवर पोहचला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे एकट्या अमेरिकेत 67 हजाराहून अधिक बळी घेतले आहेत. याबाबत Johns Hopkins University च्या हवाल्याने माहिती प्राप्त झाली आहे. दुसरीकडे कोरोना व्हायरसची जगभरातील संक्रम सुद्धा दिवसागणिक वाढत आहे. आजतागायत तब्बल 35 लाख नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. चीन मधून सुरु झालेला हा व्हायरस सुरुवातीला वुहान या शहरात त्यांनंतर इटली, स्पेन ला पिछाडून आता अमेरिकेत सुद्धा मृत्यू तांडव करत आहे. Coronavirus Outbreak: लॉक डाऊनचे नियम शिथिल; इटलीची फिल्म इंडस्ट्री पुन्हा सुरु, तर इराणमध्ये मशिदी आणि शाळा उघडण्यास परवानगी
कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत मागील दोन महिन्यापासून सर्व काही बंद आहे, परिणामी लाखो लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. या व्हायरसवर मात करण्यासाठी ब्रिटनच्या ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी मध्ये कोविड-19 वरील लस तयार करण्यात आली असून आता त्याची प्राथमिक चाचणी केली जात आहे. 2020 संपण्याच्या आधी कोरोनाला पूर्णपणे नष्ट करता येईल अशी लस बनवणारच असा विश्वास राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.
ANI ट्विट
Novel coronavirus deaths in the US climb by 1,450 in the past 24 hours, a tally by Johns Hopkins University shows: AFP news agency
— ANI (@ANI) May 4, 2020
दरम्यान, भारतात सुद्धा कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी सतत वाढत आहे. जगाच्या तुलनेत भारतात मृत्युदर कमी असल्याने किंचित दिलासा आहे मात्र रोज वाढणारी रुग्णसंख्या ही देखील चिंतेचा विषय ठरत आहे. आता देशात कोरोनाबाधितांचा आकाड 42,533 वर पोहचला आहे. त्यापैकी 29,453 अॅक्टिव्ह रुग्ण आणि 11,707 जणांची प्रकृती सुधारुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत कोरोनामुळे 1373 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे.