An Old Pic of a Film Set in Rome (Photo Credits: Twitter)

एकेकाळी इटली (Italy) आणि इराण (Iran) हे दोन्ही देश कोरोना व्हायरसशी (Coronavirus) फार मोठ्या प्रमावर लढत होते. मात्र इराणमध्ये पहिल्यांदाच कोरोना विषाणूच्या संसर्गाचे प्रमाण कमी झाले असून, 10 एप्रिलनंतरचे सर्वात कमी नवीन 802 रुग्ण आढळले आहेत. इराणमध्ये फेब्रुवारीच्या मध्यापासून कोरोना विषाणूची लागण होण्यास सुरूवात झाली आणि तेव्हापासूनच देशात संसर्गाच्या 96,448 घटना समोर आल्या आहेत. अशात इराणचे अध्यक्ष हसन रूहानी (Hassan Rouhani) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यपूर्वेतील कोरोना व्हायरस उद्रेकामुळे मार्चच्या सुरुवातीला बंद केलेल्या मशिदी व शाळा सोमवारी देशातील बर्‍याच भागात पुन्हा उघडल्या जातील. दुसरीकडे कोरोना व्हायरसच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटा उद्योग दीर्घ काळासाठी बंद ठेवल्यानंतर, आता रोमचा चित्रपट उद्योग सोमवारी काही प्रमाणत पुन्हा सुरू होणार आहे. परंतु यासाठी अनेक निर्बंध पाळावे लागणार आहेत.

याबाबत बोलताना हसन रूहानी म्हणाले, ‘सोमवारपासून 132 कमी जोखमीच्या किंवा 'व्हाईट शहरां’मधील मशिदी पुन्हा उघडण्यात येणार आहेत. तसेच शुक्रवारचे प्रार्थना प्रवचनही इथे सुरु होणार आहे. मात्र यावेळी आरोग्य प्रोटोकॉलचे पूर्णतः पालन करूनच या गोष्टी घडतील. सामूहिक प्रार्थनेपेक्षा सामाजिक अंतर राखणे अधिक महत्त्वाचे आहे.’ त्यानंतर ते पुढे म्हणाले. 'उन्हाळ्याच्या सुट्टीपूर्वी महिन्याभरासाठी 16 मे पर्यंत शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार कमिटी करत आहे.' फेब्रुवारीच्या मध्यापासून इराणमध्ये नवीन कोरोना व्हायरसचे पहिले प्रकरण समोर आल्यानंतर आतापर्यंत 6,150 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, यामुळे सध्या सरकार जपून पावले टाकत आहे. (हेही वाचा: Coronavirus Outbreak: फ्रांसमधील Health Emergency 24 जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय)

सोबतच इटलीच्या लाझिओ (Lazio) प्रांतातील चित्रपट आणि दूरदर्शन उद्योग सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यावेळी वेळोवेळी कोरोना विषाणूच्या चाचण्या, मास्कचा वापर, सामाजिक अंतर अशा गोष्टींचे पालन करणे आवश्यक असणार आहे. सध्या तरी फक्त लाझिओ प्रांतामाध्येच याची परवानगी देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, संरक्षणात्मक उपकरणे आणि सॅनिटरी नियमांचे प्रशिक्षणही आवश्यक असणार आहे. तसेच सेटवर कंपनीच्या डॉक्टरची उपस्थिती आणि हायड्रॉल्कोहोलिक सॅनिटायझिंग सोल्यूशन्सवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असणार आहे.