Coronavirus: कोरोना व्हायरस महामारीमुळे 2021 पर्यंत 15 कोटी लोकांवर ओढावेल अत्यंत गरिबीची परिस्थिती- World Bank 
World Bank (Photo Credit: PTI)

कोरोना विषाणू (Coronavirus) साथीमुळे सध्या अनेक देश आर्थिक समस्यांचा सामना करीत आहेत. या साथीमुळे कित्येक लोकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक लोक बेरोजगार झाले. आता जागतिक बँकेने (World Bank) बुधवारी इशारा दिला आहे की, 2021 पर्यंत जवळपास 15 कोटी लोक अजूनच गरीब (Extreme Poverty) होतील. ही परिस्थिती उद्भवल्यानंतर देशांना स्वतंत्र अर्थव्यवस्था निर्माण करण्याच्या दिशेने पुढाकार घ्यावा लागेल, असे जागतिक बँकेचे म्हणणे आहे. कोविड साथीच्या नंतर अर्थव्यवस्थेला भांडवल, कामगार, कौशल्य आणि नवीन व्यवसाय व क्षेत्रासाठी वेगवेगळे पुढाकार घ्यावे लागतील, असे संघटनेने म्हटले आहे.

वॉशिंग्टनस्थित ग्लोबल लँडरच्या मते, कोविड-19 हा आजार, 88 दशलक्ष ते 115 दशलक्ष लोकांना फार मोठ्या गरिबीमध्ये ढकलेल. 2021 पर्यंत ही संख्या वाढून 150 दशलक्षांवर पोहोचेल. Biennial Poverty and Shared Prosperity Report, अहवालानुसार, 2017 मध्ये 9.2 टक्के दराने रिग्रेशन दिसून आले होते. जगात कोरोना साथीचा रोग पसरला नसता तर, 2020 मध्ये दारिद्र्याचे प्रमाण 7.9 टक्के राहिले असल्याची अपेक्षा आहे.

जागतिक बँक समूहाचे अध्यक्ष डेव्हिड मालपास म्हणाले की, महामारी आणि जागतिक मंदीमुळे जगातील 1.4 टक्के लोकसंख्या फारच गरीब होऊ शकते. आर्थिक विकास आणि दारिद्र्य कमी करण्यासाठी हे चक्र उलटे करण्याची गरज आहे आणि त्यासाठी देशांना कोरोनानंतरची अर्थव्यवस्था तयार करावी लागेल ज्यामध्ये नवीन व्यवसाय आणि क्षेत्रांमध्ये प्रवेश करण्यासाठी, भांडवल, कामगार, कौशल्ये यांनी परवानगी द्यावी लागेल. आता असा विश्वास आहे की आधीच गरीब असलेल्या देशांमध्येच अजून गरिबी वाढू शकेल. (हेही वाचा: जगातील प्रत्येक 10 पैकी 1 व्यक्ती असू शकते कोरोना विषाणू संक्रमित- WHO)

जागतिक बँकेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, भारतात अलिकडील आकडेवारी नसल्याने जागतिक दारिद्र्य परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात अडचणी येत आहेत. भारत हा अत्यंत गरीब लोकांच्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे.