Coronavirus च्या रुग्णांवर सातत्याने 10 दिवस उपचार, डॉक्टरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Coronavirus Outbreak in China (Photo Credits: IANS)

चीन मधील वुहान शहरातून सुरुवात झालेल्या कोरोना व्हायरसमुळे आता 400 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसेंदिवस मृतांच्या आकड्यात वाढ होत असून नवीन 24 हजार प्रकरणे सुद्धा समोर आली आहेत. याच पार्श्वभुमीवर कोरोना व्हायरसच्या रुग्णांवर सातत्याने 10 दिवस उपचार करणाऱ्या एका तरुण डॉक्टरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यापूर्वी सुद्धा कोरोना व्हायरसची लागण झाल्याने एका डॉक्टरचा मृत्यू झाला होता.

डॉक्टर सॉन्ग यिंगजी (Song Yingjie) असे डॉक्टरचे नाव असून गेल्या 10 दिवसांपासून सातत्याने आरामाशिवाय कोरोना व्हायरस संक्रामित रुग्णांवर उपचार करत होता. वुहान शहरातील हेंगयांग परिसरातील यिंगजी डॉक्टर कार्यरत होता. तर रस्त्यावरुन येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना कोरोना व्हारसचे संक्रामण झाले आहे की नाही हे तपासून पाहण्याचे काम त्याच्याकडे देण्यात आले होते. तर सातत्याने काम केल्यामुळेच डॉक्टरचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.(Coronavirus च्या जाळ्यातून नागरिकांना वाचवण्यासाठी ठोस पावले उचलणार- अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प)

अतिशय काडाक्याच्या थंडीच्या वातावरणात यिंगजी हा वुहान मधील एका स्थानिक क्लिनिकमध्ये तैनात होता. यिंगजी याचा हाताखाली एक टीम नेमून देण्यात आली होती आणि तो त्याचे नेतृत्व करत होता. कार्यरत असलेल्या ठिकाणी भयंकर थंडीचे तापमानात सुद्धा यिंगजी यांची टीम कोरोना व्हायरस संक्रमणाचे काम करत होती.

कोरोना व्हायरस याची लक्षणे म्हणजे प्रामुख्याने सर्दी, तापाची लक्षणं सुरवातीच्या टप्यात दिसतात. त्यानंतर श्वसनामध्ये त्रास जाणवू लागल्याने अनेकांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. कोरोना विषाणू पहिल्यांदा डिसेंबर 2019 महिन्यात चीनमधील वुहान मध्ये आढळला त्यानंतर तो बिजिंग आणि इतर शहरामध्ये पसरत आहे.